"सचिनचा जावई होण्यासाठी...." सारा अली खानबरोबरच्या त्या व्हायरल फोटोवरून शुभमन झाला ट्रोल spg 93 | cricketer shubman gill trolled after photo viral with actress sara ali khan | Loksatta

“सचिनचा जावई होण्यासाठी…” सारा अली खानबरोबरच्या ‘त्या’ व्हायरल फोटोवरून शुभमन झाला ट्रोल

शुबमन गिल आणि सारा तेंडुलकर यांचं नाव अनेकदा जोडलं गेलं आहे.

shubman sara ali khan
फोटो सौजन्य : लोकसत्तात ग्राफिक टीम

क्रिकेटर शुबमन गिल मागच्या काही दिवसांपासून सातत्याने चर्तेत आहे. कधी सारा अली खान तर कधी सारा तेंडुलकर यांना डेट करत असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर होताना दिसतात. अशातच शुबमन गिल आणि साराचा एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. यावरून नेटकऱ्यांनी कमेंट्स करण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे हे दोघे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

शुबमन गिल आणि साराच अहमदाबाद विमानतळावरचा फोटो व्हायरल होत आहे. यामध्ये साराने जम्प सूट परिधान केला असून शुभमन निळ्या रंगाच्या हुडीमध्ये दिसत आहे. या दोघांच्या फोटोवरून तरी हे दोघे डेट करत आहेत अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकरी कमेंट करू लागले आहेत.

“सचिनसुद्धा शून्यावर…” ‘सर्कस’ चित्रपटाच्या अपयशावर सिद्धार्थ जाधवची प्रतिक्रिया चर्चेत

सध्या ट्वीटरवर हा फोटो व्हायरल होत आहे. एकाने लिहले आहे, “आता आम्ही तुमचे नाते पक्के समजू का?” तर दुसऱ्याने लिहले आहे, “हा खरा फोटो आहे की एडिट केलेला आहे?” तर आणखीन एकाने लिहले आहे “सचिनचा जावई होणं तुला १० जन्मात शक्य नाही.” एकाने तर थेट प्रश्न विचारला आहे की “तुमचं नातं पक्के का?’ अशा प्रतिक्रिया येत आहे.

काही दिवसांपूर्वीच त्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यात मैदानावरील क्रिकेटप्रेमी सारा-सारा असं ओरडताना दिसले होते. त्यानंतर पुन्हा सारा आणि शुबमन यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं होतं. तसेच शुबमन गिल आणि सारा तेंडुलकर यांचं नाव अनेकदा जोडलं गेलं आहे. त्यांना अनेकदा स्पॉट करण्यात आले आहे. या नात्यावर अद्याप अधिकृत कुणीही बोललेलं नाही. पण त्यांना अनेकदा एकत्र स्पॉट केल्यामुळे अफेअरच्या चर्चा रंगल्या आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-02-2023 at 12:04 IST
Next Story
Video : “आयुष्यात कधीच कुटुंबियांच्या…” सिद्धार्थ जाधवचं लग्नाबाबत भाष्य, अभिनेत्याचा ‘तो’ व्हिडीओ चर्चेत