या क्षणी तुम्ही कोणत्याही सोशल मीडिया माध्यमावर गेलात तर तिथे तुम्हाला ‘मोये मोये’ या सर्बियन गाण्यावरील व्हिडीओ पाहायला मिळतील. हा ट्रेंड सगळ्यात पहिले, टिकटॉकच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचला. यामध्ये बऱ्याच टिकटॉकर्सनी डझनम गाण्यातील ‘मोये मोये’ हा एक भाग घेऊन त्यावर त्यांना आवडतील तसे व्हिडीओ बनवून शेअर केले. नंतर या गाण्याची क्रेझ इन्स्टाग्राम, फेसबुक आणि युट्युब यांसारख्या सर्व सोशल माध्यमांवर वेड्यासारखी पसरली असल्याचे आपण पाहू शकतो.

एक गोष्ट मात्र तुम्हाला ऐकून नक्की धक्काच बसेल की ‘मोये मोये’ या नावाने प्रचलित झालेलं गाणं बऱ्याच वर्षांपूर्वी आपल्या भारतात सादर केलं गेलं आहे. इतकंच नव्हे तर भारतात प्रदर्शित झालेलं हे ‘मोये मोये’ गाणं एका प्रसिद्ध पंजाबी गायकाने गायलं होतं. त्या गायकाचं नाव म्हणजे दलेर मेहंदी. ‘मोये मोये’ या गाण्यावर दलेर मेहंदी यांनी बऱ्याच वर्षांपूर्वी भारतीयांना थीरकायला लावलं होतं.

नुकतंच दलेर यांनी ‘द लल्लनटॉप’च्या ‘गेस्ट इन द न्यूजरूम’ या कार्यक्रमात हजेरी लावली. या मुलाखतीदरम्यानच दलेर मेहंदी यांनी या गोष्टीचा खुलासा केला. याबरोबरच त्यांनी ‘मोये मोये’चा नेमका अर्थ काय तेदेखील सांगितले. दलेर मेहंदी म्हणाले, “या गाण्याचा अर्थ म्हणजे मरून जाणे. जसं ‘चुन्नी नाल मुखड़े नू ढकनी, अंसी मोये-मोये’ या संपूर्ण ओळीचा अर्थ असा की तू तुझा चेहेरा ओढणीने लपव नाहीतर माझं काही खरं नाही.”

आणखी वाचा : ‘विमल’ च्या जाहिरातीत झळकलेल्या सौंदर्या शर्माचं ट्रोलर्सना सडेतोड उत्तर; म्हणाली, “या सुपरस्टार्सबरोबर…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१९९६ सालच्या ‘दर्दी रब रब’ या अल्बमसाठी दलेर मेहंदी यांनी हे ‘मोये मोये’ गाणं रेकॉर्ड केलं होतं. सध्या सोशल मीडियावर दलेर मेहंदी यांचं गाणं आणि सर्बियन गाणं यांची तुलना करून एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामुळेच लोकांना दलेर मेहंदी यांच्या या जुन्या गाण्याची आठवण झाली आहे. हे पाहून दलेर मेहंदी फारच खुश आहेत असं त्यांनी या मुलाखतीमध्ये स्पष्ट केलं आहे. हे गाणं वेगळ्या भाषेतील असूनही जगभरात याला प्रचंड प्रमाणात प्रसिद्धी मिळाली आहे. यावरूनच, संगीत या विषयाला भाषेचे बंधन नसते हे दिसून येते. आपण जगाच्या कोणत्याही भागातील असलो, तरीही संगीत सगळ्यांना बांधून ठेवण्याचे काम करत असते.