बॉलिवूड अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. रोहित गर्ग नावाच्या एका तरुणाने सलमान खानच्या जवळच्या सहकाऱ्याला ई-मेल पाठवून ही धमकी दिली. या ईमेलमध्ये तुरुंगात शिक्षा भोगत असलेला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या अलीकडील मुलाखतीचा संदर्भ देण्यात आला आहे. ज्यामध्ये बिश्नोईने दावा केला होता की, “सलमान खानला मारणं हेच त्याच्या आयुष्याचं ध्येय आहे”.

सलमान खानला धमकीचा ई-मेल प्राप्त झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच सलमान खानच्या निवासस्थानाबाहेरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

Salman Khan firing case Facebook account named Anmol Bishnoi was opened on same day of shooting
अभिनेता सलमान खान गोळीबार प्रकरण : गोळीबाराच्या दिवशीच अनमोल बिष्णोई नावाचे फेसबुक खाते उघडले
Kangana Ranaut Vikramaditya Singh Himachal Pradesh Mandi Loksabha Election 2024
Celebrity Fight: कंगनासमोर राजघराण्यातील वंशजाचे आव्हान; सोनिया गांधींनी केली वाट बिकट
Rohit Sharma Talking about his retirement in the Breakfast with Champions show
रोहित शर्मा कधी म्हणणार क्रिकेटला अलविदा? हिटमॅनने निवृत्तीबाबत केलं मोठं वक्तव्य
Mumbai Police Arrest Accused Pretending to be from Akshay Kumar s Production Company Trying to Cheat
अभिनेता अक्षय कुमारच्या नावाने तरूणीला फसवण्याचा प्रयत्न, आगामी चित्रपटात भूमिका देण्याचे आमिष

धमकीच्या ई-मेलमध्ये काय म्हटलं?

सलमान खानचा जवळचा सहकारी प्रशांत गुंजाळकर याला शनिवारी धमकीचा ई-मेल पाठवण्यात आला. मेल पाठवणाऱ्या तरुणाचं नाव रोहित गर्ग असल्याची माहिती समोर येत आहे. सलमान खानच्या टीमने संशयित आरोपी रोहित गर्ग, गोल्डी ब्रार आणि लॉरेन्स बिश्नोई यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली.

सलमान खानच्या टीमने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी रोहित गर्गने ई-मेलमध्ये लिहिलं की, कुख्यात गुंड गोल्डी ब्रारला सलमान खानशी बोलायचं आहे. यामध्ये नुकत्याच झालेल्या लॉरेन्स बिश्नोईच्या मुलाखतीचाही संदर्भ देण्यात आला आहे. ज्यामध्ये लॉरेन्स बिश्नोई याने सलमान खानला मारणं हे त्याच्या आयुष्याचं ध्येय असल्याचं म्हटलं होतं.

“गोल्डी ब्रारला तुमच्या बॉसशी (सलमान खान) बोलायचे आहे. त्याने गँगस्टर बिष्णोईची मुलाखत नक्कीच पाहिली असेल. जर सलमानने ती मुलाखत पाहिली नसेल तर त्याला ती पाहायला सांगा. जर हे प्रकरण कायमचं बंद करायचं असेल तर सलमान खानला गोल्डी ब्रारशी बोलू द्या. त्यांना समोरासमोर बोलायचं असेल तर तसं कळवा. यावेळी आम्ही तुम्हाला वेळेवर कळवलं आहे. पुढच्या वेळी थेट धक्का देऊ” असा मजकूर पत्रात लिहिला आहे. याबाबतचं वृत्त ‘इंडिया टुडे’नं दिलं आहे.