बॉलिवूड अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा लॉरेन्स बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. सलमान खानबरोबर यावेळी राखी सावंतलाही धमकीचा ईमेल प्राप्त झाला आहे. सलमान खान धमकी प्रकरणापासून दूर राहण्याचा इशारा राखी सावंतला देण्यात आला आहे. राखीने या प्रकरणापासून दूर न राहिल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील, असं धमकीच्या ईमेलमध्ये लिहिलं आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.

याआधी, मार्चमध्ये सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईच्या गँगकडून ही धमकी देण्यात आली होती. तेव्हा लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीकडून मिळालेल्या धमकीवर राखी सावंत म्हणाली होती की, सलमान खान हा एक दिग्गज अभिनेता आहे. त्याच्याबद्दल कुणीही वाईट विचार करू नये. सलमान खानऐवजी मी तुमची माफी मागते, असं राखी सावंत प्रसारमाध्यमांसमोर बोलली होती.

तेव्हा राखी सावंत म्हणाली होती की, मी माझ्या भावाच्या (सलमान खान) वतीने बिश्नोई समाजाची माफी मागते. माझा भाऊ सलमानवर वाईट नजर ठेवू नका. सलमान खान हा देवमाणूस आहे. तो गरिबांचा देवता आहे. मला सलमान भाईच्या शत्रूंचे डोळे फुटावेत. त्यांची स्मरणशक्ती नष्ट व्हावी. माझा भाऊ सलमानबद्दल कुणीही वाईट विचार करू नये, म्हणून मी देवाकडे प्रार्थना करते.

हेही वाचा- Video : …अन् शाहरुख खानने स्वत:चा अवॉर्ड सलमान खानला दिला; ‘त्या’ पुरस्कार सोहळ्यात नेमकं काय घडलं?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या महिन्यात ज्या व्यक्तीने सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती, त्याचं नाव ‘रॉकी भाई’ असं होतं. याप्रकरणी पोलिसांनी तपास केला असता, संबंधित आरोपी राजस्थानातील जोधपूर येथील रहिवाशी असल्याचं निष्पन्न झालं. “आपण गोरक्षक आहोत” असा दावा आरोपीनं केला आहे. विशेष म्हणजे सतत जीवे मारण्याची धमकी मिळत असल्याने सलमान खानने बुलेट प्रूफ गाडी खरेदी केली आहे. ही गाडी दुबईवरून आयात करण्यात आली असून याचं अद्याप भारतात लाँचिंग करण्यात आलं नाही. निसान कंपनीची ही गाडी सर्वात महागड्या गाड्यांपैकी एक आहे.