scorecardresearch

“आम्ही काही नवा शोध लावलेला नाही…”, ‘गहराइयां’मधील इंटिमेट सीनबद्दल बोलताना दीपिका पदुकोण संतापली

नुकतंच तिने या टीकांवर स्पष्टीकरण देत इंटिमेट सीन शूट करतानाच्या अडचणींबद्दल सांगितले आहे.

दिग्दर्शक शकुन बत्रा यांचा आगामी ‘गहराइयां’ चित्रपटाची सोशल मीडियावर सध्या बरीच चर्चा आहे. या चित्रपटात अभिनेत्री दीपिका पादुकोण, सिद्धांत चतुर्वेदी आणि अनन्या पांडे यांच्या मुख्य भूमिका पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या चित्रपटात दीपिकाने काही इंटिमेट सीन्स दिले असून त्याची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. विशेष दीपिका आणि अभिनेता सिद्धांतमधील एक किसींग सीन चांगलाच चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून यावरुन तिच्यावर टीका होत आहे. नुकतंच तिने या टीकांवर स्पष्टीकरण देत इंटिमेट सीन शूट करतानाच्या अडचणींबद्दल सांगितले आहे.

दीपिका पदुकोणने नुकतंच एका मुलाखतीत इंटिमेट सीन शूट करण्याबद्दल विचारण्यात आले. त्यावर ती म्हणाली, “मी याआधी कधीही ऑन-स्क्रीन इंटिमेट सीन करण्याचा प्रयत्न केलेला नाही. जेव्हा मला चित्रपटातील इंटिमेट सीन शूट करण्याबाबत विचारण्यात आले तेव्हा मी फार आश्चर्यकारक उत्तर दिले होते. या चित्रपटातील त्या इंटिमेट सीनचे सर्व श्रेय दिग्दर्शकाला जाते. जेव्हा तुम्हाला तुमच्या दिग्दर्शकाचा हेतू कळतो, तेव्हा तुम्हाला अशाप्रकारचे दृश्ये चित्रीत करणे सोपे जाते.”

यासोबतच तिने यावेळी दिग्दर्शक शकुन बत्राचे कौतुकही केले. “शकुनने मला आणि आम्हाला सर्वांनाच एक कम्फर्ट दिला. कारण जेव्हा तुम्हाला सुरक्षित वाटते तेव्हाच तुम्हाला इंटिमेट सीन करणे सोपे जाते. आम्ही याचा काही नवा शोध लावला आहे, असे काहीही नाही. या चित्रपटापूर्वीही भारतीय चित्रपटसृष्टीत अशी अनेक दृश्ये चित्रीत झाली आहेत.”

“त्यामुळे एखादा इंटिमेट सीन किंवा बोल्ड सीन दाखवणे हे दिग्दर्शक केवळ नेत्रसुख आणि आनंदासाठी करत नाही. त्यासाठी धैर्य लागते. कारण तिथूनच पात्रांची खरी सुरुवात होते. त्यांचा अनुभव आणि प्रवास, हे सर्व काही तेव्हाच शक्य असते जेव्हा तुम्हाला या वातावरणात सुरक्षित वाटत असते. विशेष म्हणजे दिग्दर्शकाने ही सीन चित्रित करण्यासाठी आणि कलाकारांना आरामात ठेवण्यासाठी एका वेगळ्या सहाय्यक दिग्दर्शकाची नियुक्ती केली होती,” असेही दीपिका म्हणाली.

डान्सच्या बाबतीत सलमानलाही टक्कर देतो बॉडीगार्ड शेरा, व्हिडीओ एकदा पाहाच

या चित्रपटाचे दिग्दर्शक शकुन बत्राने केले आहे. तर या चित्रपटात दीपिका आणि सिद्धांथ व्यतिरिक्त अनन्या पांडे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची निर्मिती धर्मा प्रोडक्शनने केली आहे. आता हा चित्रपट फक्त भारतात नाही तर परदेशात ही अॅमेझॉन प्राइमच्या माध्यमातून प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Deepika padukone opens up about filming intimate scenes in gehraiyaan says director is not doing it for eyeballs nrp

ताज्या बातम्या