बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोण अलीकडेच कोलकातामध्ये दिसली. जुन्या कोलकातातील उपनगरात ‘तमाशा’ या तिच्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होते. यावेळी तिने डेनिम जीन्सवर फुला-फुलांचा टॉप आणि पिवळ्या रंगाचा ओव्हर कोट घातला होता. गेल्या वर्षी फ्रान्समध्ये तिने या चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात केली होती. नंतर शिमलाला चित्रीकरण केले. ‘बचना ए हसिनो’ आणि ‘ये जवानी है दिवानी’ चित्रपटामधून एकत्र काम करून अनेकांची मने जिंकणारी दीपिका पदुकोण आणि रणबीर कपूरची जोडी ‘तमाशा’मध्ये पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहे. या जोडीच्या तथाकथित प्रेमाचे आणि ब्रेकअपचे किस्से माध्यमातून खूप चर्चिले गेले होते. कोलकातामधील या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाल्यावर पुढील महिन्यात दीपिका आणि रणबीर दिल्लीमध्ये होणाऱ्या शेवटच्या टप्प्याच्या चित्रीकरणात भाग घेतील. २०१६ च्या ख्रिसमसदरम्यान हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 19th Jan 2015 रोजी प्रकाशित
दीपिकाचा कोलकातामध्ये ‘तमाशा’!
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोण अलीकडेच कोलकातामध्ये दिसली.
First published on: 19-01-2015 at 07:11 IST
TOPICSदीपिका पदुकोणDeepika PadukoneबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजनManoranjanरणबीर कपूरRanbir Kapoorहिंदी चित्रपटHindi Filmहिंदी सिनेमाHindi Cinema
+ 3 More
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deepika padukone spotted filming for tamasha in kolkata