अभिनेता देव पटेल ‘स्लमडॉग मिलेनियर’ चित्रपटासाठी ओळखला जातो. तो आता दिग्दर्शनात पदार्पण करतोय, त्याचा ‘मंकी मॅन’ चित्रपट आज (११ मार्च) प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभिनेत्री सोभिता धुलीपालाही महत्त्वाच्या भूमिकेत आहे. मोठं होत असताना आपल्या भारतीय वंशाची लाज वाटायची, असा खुलासा देवने ‘द केली क्लार्कसन शो’मध्ये केला.

३३ वर्षीय देव पटेलचा जन्म लंडनमध्ये झाला आणि तो तिथेच लहानाचा मोठा झाला. आपल्या वंशाबद्दल एकेकाळी राज वाटायची, असं देवने म्हटलंय. “एक काळ असा होता जेव्हा मला माझ्या भारतीय वंशाची लाज वाटायची. जेव्हा तुम्ही ग्रेटर लंडनमध्ये शाळेत असता तेव्हा ती गोष्ट अजिबात ‘कूल’ नसते,” असं देव म्हणाला.

“‘स्लमडॉग मिलेनियर’ व आतासारखे चित्रपट करताना ती गोष्ट दाखवू नये यासाठी मी प्रयत्न करत आहे. मला आता जाणवलं की मी ज्या पहिल्या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे, त्यातून मी संस्कृती दुप्पट नाही तर तिप्पट कमी करणार आहे,” असं देव पटेल म्हणाला.

महिला ज्योतिष एन्फ्लुएन्सरने पती अन् मुलांचा खून करून स्वतःला संपवलं, सूर्यग्रहण ठरलं निमित्त

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देव पटेल ‘मंकी मॅन’ चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. हा अॅक्शन-थ्रिलर चित्रपट असून यातून सामाजिक समस्यांवर भाष्य करण्यात आलं आहे. आपलं जीवन उद्ध्वस्त करणाऱ्या काही उच्चभ्रू लोकांचा बदला घेणाऱ्या एका माणसाची कथा यात दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट भारतीय पौराणिक कथांपासून प्रेरित आहे.