Devara Part - 1 : २७ सप्टेंबरला प्रदर्शित होणाऱ्या ‘देवरा: पार्ट १’ चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री जान्हवी कपूर या चित्रपटाच्या माध्यमातून दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. या चित्रपटात जान्हवी सुपरस्टार्स ज्युनियर एटीआरबरोबर पाहायला मिळणार आहे. काल, ५ ऑगस्टला ‘देवरा: पार्ट १’ चित्रपटातील दुसरं गाणं 'धीरे-धीरे' प्रदर्शित झालं. या रोमँटिक गाण्यातील ज्युनियर एनटीआर व जान्हवी कपूरच्या रोमान्सने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पण संगीतकाराने 'धीरे-धीरे' गाणं कॉपी केल्याचा दावा नेटकरी करत आहेत. ‘देवरा: पार्ट १’ ( Devara Part - 1 ) चित्रपटातील 'धीरे-धीरे' हे रोमँटिक गाणं तेलुगू, तमिळ, कन्नड, मल्याळम आणि हिंदी या पाच भाषेत प्रदर्शित झालं आहे. या गाण्यात ज्युनियर एनटीआर व जान्हवीची सुंदर केमिस्ट्री दिसत आहे. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतला प्रसिद्ध संगीतकार अनिरुद्ध रविचंदरने हे गाणं संगीतबद्ध केलं आहे. तर लोकप्रिय गायिका शिल्पा रावने गायलं आहे. तसंच कौसर मुनीर 'धीरे-धीरे' गाण्याचे गीतकार आहेत. ‘बँग बँग’, ‘तौबा तौबा’ सारख्या सुपरहिट गाण्यांचा नृत्यदिग्दर्शक बॉस्को मार्टिसने ‘धीरे-धीरे’चं नृत्यदिग्दर्शन केलं आहे. अशा तगड्या कलाकार मंडळींनी ज्युनियर एनटीआर व जान्हवी कपूरच्या या रोमँटिक गाण्यासाठी काम केलं आहे. पण सोशल मीडियावर गाण्याच्या संगीतकाराला म्हणजे अनिरुद्धला ट्रोल केलं जातं आहे. Devara Part - 1 हेही वाचा - Bigg Boss Marathi : छोट्या पुढारीसमोर हात जोडून अंकिता प्रभू वालावलकर पडली पाया, नेमकं काय घडलं? पाहा… नेटकऱ्यांचं म्हणणं आहे की, तीन वर्षांपूर्वी सुपरहिट झालेलं योहानीचं 'माणिक मागे हिते' गाण्याची कॉपी केली आहे. ‘धीरे-धीरे’ गाण्याचं संगीत 'माणिक मागे हिते'सारखं असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे संगीतकार अनिरुद्ध रविचंदरला सध्या ट्रोल केलं जातं आहे. नेटकरी काय म्हणतायत पाहा. #Chuttamalle X Manike Mage hithe ??? pic.twitter.com/GwfX4KoGrt— KShan?♂️??♂️? (@ShanThalapathy6) August 5, 2024 Nakendukoo manike Mage Hithe Beats Laa Vinipisthundi ?pic.twitter.com/tz9Wvq4Yom— @Urs_WK_Dhfm ?️?️ (@UrsWkDhfm) August 3, 2024 Three years ago, Yohani created a cover version of "Manike Mage Hithe" which received a better reception than the original. Subsequently, T-Series incorporated that cover version into Bollywood, and now T-Series has used the same song as #Chuttumalle for #devara pic.twitter.com/0HjjEGuZ6C— Ubais (@This_Is_Ubais) August 5, 2024 Kaadhal Kan Kattudhe mela Manike Mage Hithe va thoovi apdiye tinkering panni recycle panirukar nanbar. https://t.co/yicrpfQSmQ— Balasubramanian (@balas2405) August 5, 2024 Manike mage hithe × Kutty Story rendayum kalandhu adichurukkan.pic.twitter.com/si6RUVvcu5— David Billa TVK ? (@David_Billaaaaa) August 5, 2024 हेही वाचा – “शेतकऱ्याची पोरं…”, ऑलिम्पिकमध्ये अविनाश साबळेची कामगिरी पाहून हेमंत ढोमे भारावला, म्हणाला, “प्रचंड अभिमान…” दरम्यान, ‘देवरा: पार्ट १’ ( Devara Part - 1 ) चित्रपटाचं चित्रकरण जवळपास पूर्ण झालं आहे. माहितीनुसार, चित्रपटातील काही गाण्यांचं चित्रीकरण बाकी असून लवकरच ते पूर्ण केलं जाणार आहे. कोराताला शिवा लिखित, दिग्दर्शित या चित्रपटात ज्युनियर एनटीआर, जान्हवी कपूरसह ( Janhvi Kapoor ) सैफ अली खान, श्रुती मराठे, प्रकाश राज, श्रीकांत, शाइन टॉम चाको आणि नारायण आहेत.