दाक्षिणात्य सिनेमांच्या कथा आणि त्या पडद्यावर मांडण्याची पद्धत नेहमीच हटके असते. ‘पोन्नियिन सेल्वन’, ‘बाहुबली’, आणि ‘आरआरआर’ या सिनेमांच्या वेगळ्या कथा आणि भव्य स्वरूपात केलेली मांडणी प्रेक्षकांना खूप भावली आहे. भव्य सेट्स, तंत्रज्ञानाचा उत्कृष्ट वापर करून दाखवलेले सिनेमे प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. आता असाच एक भव्य सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय, ज्याचे नाव आहे ‘देवरा: पार्ट १’. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. यातील पात्रांच्या वेशभूषा, त्यांची स्टाईल, जबरदस्त अ‍ॅक्शन, अंगावर काटा आणणारे फायटिंग सीन्स, आणि समुद्रातील अ‍ॅक्शन दृश्ये यामुळे ट्रेलर प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.

‘देवरा’ सिनेमाच्या ट्रेलरमध्ये सर्वात प्रथम लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे सिनेमाची तगडी स्टारकास्ट. या सिनेमात धमाकेदार अ‍ॅक्शन सीन करताना दिसतो तो ज्युनियर एनटीआर. तर सैफ अली खान खलनायकाच्या भूमिकेत तो प्रचंड रक्तपात करताना दिसत आहेत. याशिवाय जान्ह्ववी कपूर, प्रकाश राज, आणि मराठमोळी अभिनेत्री श्रुती मराठे देखील ट्रेलरमध्ये दिसत आहेत. श्रुती या सिनेमात अतिशय महत्वाच्या भूमिकेत आहे अस ट्रेलरमध्ये तिच्या असणार्‍या उपस्थितीमुळे जाणवत. जान्हवी कपूर या चित्रपटाच्या माध्यमातून दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे.

हेही वाचा…रश्मिकाचा मंदानाचा अपघात, पोस्ट करत म्हणाली, “गेले काही दिवस मी…”

ज्युनियर एनटीआर या सिनेमात दुहेरी भूमिकेत दिसणार असून ट्रेलर मध्ये त्याची असणारी एन्ट्री एकदम दमदार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्येच त्याचे आणि सैफ अली खानचे एकमेकांबरोबरचे फाईट सीन्स जबरदस्त आहेत. ज्युनियर एनटीआरच्या एन्ट्रीवेळी ट्रेलरमध्ये वाजणार पार्श्वसंगीत अंगावर काटा आणत. ट्रेलर जसाजसा पुढे जातो हे पार्श्वसंगीत प्रेक्षकांना खिळवून ठेवतं. ट्रेलरमधील प्रत्येक प्रसंगाला साजेसं असणारं संगीत हे वाय दीज कोलावरी फेम अनिरुद्धने दिलं आहे.

या सिनेमातील समुद्राच्या पाण्याखालील अ‍ॅक्शन दृश्ये कल्पनेपलीकडे जाणारी आहेत. ‘पोन्नियिन सेल्वन’मध्ये आपण पाण्यातील लढाई जहाजांच्या सहाय्याने करताना पाहिली आहे. परंतु ‘देवरा’ सिनेमात पाण्यातील लढाईचे दृश्य अधिक भव्य स्वरूपात दाखवण्यासाठी दिग्दर्शकाने नवीन कल्पनांचा वापर केला आहे, असे ट्रेलरमध्ये दिसते.

हेही वाचा…रेखा यांच्याबरोबरच्या नात्याबद्दल विचारल्यावर अमिताभ बच्चन म्हणाले होते, “ती माझी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘देवरा: पार्ट १’ हा चित्रपट २७ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. कोराताला शिवा लिखित आणि दिग्दर्शित या चित्रपटात ज्युनियर एनटीआर, जान्हवी कपूर, श्रीकांत, शाइन टॉम चाको, आणि नारायण हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमाच्या ट्रेलर प्रदर्शित होण्याआधी ज्युनियर एनटीआर आणि सैफ अली खानच्या फर्स्ट लुकसह एक टीजर प्रदर्शित करण्यात आला होता.