Dhadak 2 Box Office Collection Day 5 : करण जोहरची निर्मिती असलेला ‘धडक २’ १ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला होता. चित्रपटाला प्रदर्शित होऊन पाच दिवस झाले आहेत. परंतु, चित्रपटाला प्रेक्षकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळालेला दिसत नाही. सिद्धार्थ चतुर्वेदी व तृप्ती डिमरी यांची मुख्य भूमिका असलेल्या चित्रपटाने चार दिवसात १२.८० कोटींची कमाई केलेली. पहिल्या दिवशी चित्रपटाने ३.५ कोटी, दुसऱ्या दिवशी ३.७५ कोटी, तिसऱ्या दिवशी ४.१५ कोटी तर चौथ्या दिवशी या चित्रपटाने केवळ १.३५ कोटींची कमाई केली होती. या चित्रपटाने पाचव्या दिवशी ५ ऑगस्टला १.६० कोटी इतका गल्ला जमावला होता. त्यामुळे आतापर्यंत या चित्रपटाने एकूण १४.३५ कोटींचं बॉक्स ऑफिस कलेक्शन केलं. सध्या चित्रपटगृहांमध्ये ‘सैयारा’ आणि ‘महावतार नरसिम्हा’ या चित्रपटांची क्रेझ असलेली दिसते. १८ जुलै रोजी प्रदर्शित झालेल्या ‘सैयारा’ने १९ दिवसांत बॉक्स ऑफिसवर तब्बल ३०४.६० कोटी इतकी कमाई केली. तर ५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या ‘महावतार नरसिम्हा’ चित्रपटाने १२ दिवसात १०६.०५ इतका गल्ला जमावला. त्यामुळे या दोन चित्रपटांच्या तुलनेत ‘धडक २’ला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला दिसत नाही.
Entertainmentt News Updates
"मी फक्त गेमिंग अॅपचा प्रचार केला…", विजय देवरकोंडाची प्रतिक्रिया; ईडीच्या चौकशीनंतर दिलं स्पष्टीकरण
काजोलने अजय देवगणच्या ऑनस्क्रीन मुलांबरोबर साजरा केला वाढदिवस; चाहते म्हणाले, "त्यांचे नाते..."
रश्मिका मंदाना १३ वर्षांनी मोठ्या अभिनेत्याबरोबर करणार होती लग्न; साखरपुड्याचे फोटो व्हायरल
रिंकू राजगुरूने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाल्यानंतर व्यक्त केली कृतज्ञता; फोटो शेअर करीत म्हणाली…
"त्याने रागाच्या भरात दार उघडले अन्…", सलमान खान 'हम दिल दे चुके सनम' च्या सेटवरून रागाने निघून गेलेला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली…
अजय-काजोलचा गोव्यातला आलिशान व्हिला पाहिलात का? एका रात्रीसाठी मोजावे लागतील 'इतके' रुपये
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीच्या बहिणीने स्पेशल ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी आणलंय मेडल, 'या' खेळात केलीय कामगिरी
'मसक्कली' ते 'गुटूर गुटूर'! कबुतरांचा उल्लेख असलेली बॉलीवूडमधील 'ही' ५ गाणी माहितीहेत का?
१४ गाणी, ६ कोटींचे बजेट…; माधुरी दीक्षितचा 'हा' चित्रपट ठरलेला १०० कोटी कमाई करणारा बॉलीवूडचा पहिला सिनेमा
"त्या माझ्यापासून दूर जायच्या…", बॉलीवूडच्या खलनायकाने व्यक्त केलं दुःख; म्हणाले, "मुली माझ्या जवळ येण्यास घाबरत होत्या"
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणावर लवकरच चित्रपट येणार, 'माय फ्रेंड गणेशा' फेम दिग्दर्शकाची घोषणा; १७ वर्षांचा घटनाक्रम मोठ्या पडद्यावर
"तिनं मोठी चूक केली…", करीना कपूरबद्दल लोकप्रिय दिग्दर्शकाचं वक्तव्य; 'ऐतराज' चित्रपटातील 'तो' किस्सा सांगत म्हणाले…
श्रीदेवींच्या प्रेमात होते रजनीकांत; प्रपोज करणार तितक्यात लाईट गेली अन् …; नेमकं काय घडलेलं? वाचा
प्रसिद्ध मराठी अभिनेत्री धनुषला करतेय डेट? व्हिडीओ होतोय व्हायरल, म्हणाली, "नजर लागते"
चल झूठी…! गोविंदाच्या २५ वर्षांपूर्वीच्या गाण्यावर शिवाली परबचा जबरदस्त डान्स; नेटकरी म्हणाले, "तू खतरनाक आहेस…"
Video : "आता मी हिंदीत बोलू?", काजोलने हिंदीत प्रश्न विचारणाऱ्या पापाराझीला झापलं; म्हणाली, "ज्याला समजायचं आहे त्याला…"
सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार मिळाल्यानंतर हृता दुर्गुळेची खास पोस्ट; म्हणाली, "माझा प्रत्येक पुरस्कार…"
सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार मिळाल्यानंतर हृता दुर्गुळेची खास पोस्ट; म्हणाली, "माझा प्रत्येक पुरस्कार…"
"लाज नाही वाटत का?" घोडबंदर रस्त्याची दुर्दशा पाहून मराठी अभिनेत्याचा संताप; म्हणाला, "तुम्ही हेलिकॉप्टरने हिंडता पण…"
हृता दुर्गुळेला पुरस्कार मिळाल्यानंतर नवऱ्याची भावूक पोस्ट, बायकोचं केलं कौतक; म्हणाला, "तू खूप…"
Entertainment Live News Updates : ‘धडक २’ला बॉक्स ऑफिसवर अपयश; पाचव्या दिवसाचं कलेक्शन किती?
तृप्ती डिमरी व सिद्धार्थ चतुर्वेदी यांची मुख्य भूमिका असलेला 'धडक २' १ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला. परंतु, चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर अपेक्षित प्रतिसाद मिळालेला दिसत नाही.
'धडक २'ला बॉक्स ऑफिसवर अपयश (फोटो सौजन्य, लोकसत्ता)
करण जोहरची निर्मिती असलेला 'धडक २' चित्रपटगृहात १ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला होता. परंतु, या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर अपेक्षित प्रतिसाद मिळालेला दिसत नाही. तृप्ती डिमरी व सिद्धार्थ चतुर्वेदी यांची मुख्य भूमिका असलेला चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी चित्रपटगृहात गर्दी केली नाही. तर बॉक्स ऑफिसवर सध्या 'सैयारा' व 'महावतार नरसिम्हा' या चित्रपटांची क्रेझ दिसत आहे.