दाक्षिणात्य अभिनेता धनुष हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. धनुष गेल्या काही दिवसांपासून त्याच्या ऐश्वर्या रजणीकांतच्या घटस्फोटामुळे चर्चेत आहे. त्या दोघांनी विभक्त झाल्याची पोस्ट शेअर केल्यानंतर त्यांच्या चाहत्यांना धक्काच बसला होता. धनुष आणि ऐश्वर्याने १७ जानेवारी रोजी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत विभक्त झाल्याचे सांगितले. १८ वर्षे एकत्र राहिल्यानंतर ते विभक्त झाले आहेत. सध्या हे दोघेही हैद्राबादमध्ये एका हॉटेलमध्ये राहत आहे. एवढंच काय तर एकत्र काम करणार असल्याचेही म्हटले जात आहे.

ETimes ने दिलेल्या वृत्तानुसार, धनुष आणि ऐश्वर्या दोघेही रामोजी राव यांच्या स्टुडिओच्या सितारा हॉटेलमध्ये थांबले आहेत. धनुष त्याच्या चित्रपटाच्या शुटिंगसाठी तिथे थांबला आहे. तर ऐश्वर्या तिच्या गाण्यासाठी तिथे थांबली आहे. ऐश्वर्याचं नवीन गाणं हे खास व्हॅलेंटाईन डे साठी आहे. त्यामुळे ते लवकरात लवकर शूट करण्यासाठी ऐश्वर्या तिथे थांबली आहे. पुढच्या तीन दिवसात या गाण्याचं शूटिंग पूर्ण होईल. दरम्यान, धनुष आणि ऐश्वर्या यांची कामादरम्यान, भेट झाली की नाही हे अजून स्पष्ट झाले नाही.

आणखी वाचा : “…कारण माझे ब्रेस्ट मोठे नाहीत”, नीना गुप्ताच्या उत्तराने कपिल शर्माची बोलती बंद

२००२ मध्ये kadhal konden च्या स्क्रीनिंगच्या वेळी ऐश्वर्या आणि धनुष यांची पहिली भेट झाली होती. चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी ऐश्वर्या वडील रजनीकांत यांच्यासोबत आली होती. त्यावेळी धनुषचं परफॉर्मन्स पाहून ती त्याच क्षणी त्याच्या प्रेमात पडली होती. विशेष म्हणजे स्क्रिनिंगच्या दुसऱ्याच दिवशी ऐश्वर्याने धनुषच्या घरी पुष्पगुच्छ पाठवत त्याला संपर्कात रहा असं सांगितलं होतं.

आणखी वाचा : Video : ‘पुष्पा’तील सामी सामी गाण्यावर डेव्हिड वॉर्नरच्या मुलींनी केला भन्नाट डान्स

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऐश्वर्याने मैत्रीचा हात पुढे केल्यानंतर या दोघांची मैत्री वाढत गेली आणि त्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं होतं. त्यानंतर २००४ रोजी धनुष आणि ऐश्वर्याने घरातल्यांच्या संमतीने लग्न केलं. या दोघांचा लग्न सोहळा दाक्षिणात्य कलाविश्वातील गाजलेल्या लग्नसोहळ्यांपैकी एक होता. त्यांना दोन मुले आहेत. त्यांची नावे यात्रा आणि लिंगा असे आहे.