बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. प्रियांकाने अमेरिकन गायक निक जोनसशी लग्न केले. या दोघांची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. प्रियांकाने लग्न केल्यानंतर तिच्या सोशल मीडिया हॅण्डलवरुन निक जोनसचे आडनाव लावले होते. प्रियांकाने तिच्या सोशल मीडिया हॅण्डलवरुन जोनस हे तिचे सासरचे आडनाव अचानक वगळले आहे. दरम्यान, काही नेटकऱ्यांनी या दोघांचा घटस्फोट होणार असल्याचे म्हटले तर काही नेटकऱ्यांनी त्याच कारण दुसरं असल्याचं म्हटलं आहे.

असे म्हटले जाते की निकला त्याचा आगामी कॉमेडी शो ‘जोनस ब्रदर्स फॅमिली रोस्ट’च्या प्रमोशनसाठी प्रियांकाने हे केलं आहे. ‘जोनस ब्रदर्स फॅमिली रोस्ट’ हा शो आज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या शोमध्ये जोनस ब्रदर्स आणि त्यांच्या पत्नी एकमेकांना ट्रोल करताना दिसणार आहेत.

एवढचं काय तर प्रियांकाचा लवकरच ‘मॅट्रिक्स ४’ हा चित्रपट येणार आहे. प्रियांकाने काल तिच्या सोशल मीडिया हॅण्डलवरुन निक जोनसचे आडनाव काढले आणि त्यानंतर आज तिने ‘मॅट्रिक्स ४’च पोस्टर शेअर केलं आहे. आता या दोघांनी पैकी कारण असेल अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे.

आणखी वाचा : प्रियांका आणि निकच्या घटस्फोटाच्या चर्चेनंतर सोशल मीडियावर मीम्सचा वर्षाव

आणखी वाचा : आमिर ‘या’ अभिनेत्री सोबत करणार तिसरं लग्न?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रियांकाने २०१८ मध्ये निक जोनासशी लग्न केले. त्यांनी जयपूरमध्ये लग्न केले. तर त्याच वर्षी मे महिन्यात ते दोघे रिलेशनशिपमध्ये आले होते. दरमम्यान, प्रियांकाला तिची एंगेजमेंट रिंग विकत घेता यावी म्हणून निकने टिफनी स्टोअर बंद केले होते. हॉलिवूड रिपोर्टच्या मते अंगठीची किंमत ही २ कोटी रुपयांच्या आसपास आहे.