छोट्या पडद्यावरचा सूत्रसंचालक आदित्य नारायणने एकेकाळी केलं होतं शाहरुख,सलमान बरोबर काम

आत्ता पर्यंत आदित्य नारायण एक होस्ट म्हणून माहिती आहे. मात्र आदित्य नारायण ९०च्या दशकातला लोकप्रिय बाल कलाकार होता. .

sharukh-khan
Photo-Loksatta File Image

आदित्य नारायण वेगवेगळ्या कारणामुळे सतत चर्चेत असतो. त्याच्या आवाजाच्या जादूने तसंच उत्तम सूत्रसंचालक म्हणून आदित्यने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. मात्र खुप थोड्या लोकांना माहिती आहे की छोट्या पडद्यावर काम करण्यापूर्वी आदित्यने अनेक लोकप्रिय अभिनेत्यांसोबात काम केलं आहे. ९०च्या दशकात त्याने सलमान खान, शाहरुख खान सोबत काम केले आहे.

छोट्या पडद्यावरचा हा लोकप्रिय होस्ट एकेकाळी मोठ्या पडद्यावर बाल कलाकार म्हणून झळकला होता. आदित्यला राम गोपाल वर्मा यांच्या ‘रंगीला’ या चित्रपटातील एका गाण्यासाठी काही सेकंदासाठी झळकला होती. मात्र त्या काही सेकंदातच त्याने त्याच्या अभिनयाची कमाल दाखवली होती. आणि यात खास गोष्ट म्हणजे ही की त्याने या गाण्यात स्वतःच्या ओळी स्वतः गायल्या होत्या. आदित्यला १९९७च्या शाहरुख खान स्टारर ‘परदेस’ या चित्रपटातून प्रसिद्धी मिळाली. त्याने ‘पोटाला’  या लहान मुलाची भूमिका साकारली होती. यातील त्याच्या वन लायनर्स ने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते.

१९९८च्या सलमान खानच्या ‘जब प्यार किसींसे होता है’मध्ये आदित्यने कबीरची भूमिका साकारली होती. यात त्याने सलमान खानच्या सावत्र मुलाची भूमिका साकारली होती. तुम्हाला ९० सालातील  ‘मासुम’ या चित्रपटातील लोकप्रिय गाणं ‘छोटा बच्चा समझ के हम को …” आठवत असेल तर, हे गाणं देखील आदित्यने गायलं आहे. ‘मासूम’ हा चित्रपट जरी एवढा चालला नसला तरी हे गाणं सुपरहिट ठरल होतं. आदित्य आता ‘इंडियन आयडॉल’च्या ११व्या सीझनचे सूत्रसंचालन करताना दिसत आहे. तसंच ट्रॉलिंग विषयी आणि त्याच्या शो वर झालेल्या आरोपाचे देखील सडेतोड उत्तर दिल्याने तो चांगलाच चर्चेत होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Did you know popular singer host aditya narayan once shared screen with sharukh khan and salaman khan aad

Next Story
चित्ररंग : फक्त जिस्मदर्शन
ताज्या बातम्या