बॉलिवूड दिग्दर्शक आणि निर्माता अनुराग कश्यप त्याची मुलगी आलिया कश्यपसाठी कूल बाबा आहे. अनुरागच्या सोशल मीडिया अकाउंट पाहिल्यास ही गोष्ट सहज दिसून येते. अनेकदा अनुराग त्याची मुलगी अलिया आणि तिचा बॉयफ्रेंड शेन ग्रिगॉयर यांच्यासोबतचे फोटो किंवा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर करताना दिसतो. आताही त्यानं या दोघांचा एक फोटो त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोसोबत त्यानं शेन आणि आलियासाठी खास पोस्ट देखील लिहिली आहे. ज्याची चर्चा सोशल मीडियावर होताना दिसत आहे.
आलिया कश्यपचा बॉयफ्रेंड शेन ग्रिगॉयर पुढच्या महिन्याभरासाठी परदेशात जात आहे आणि त्यासाठीच अनुरागनं डिनर ठेवलं होतं. त्यानंतर अनुरागनं आलिया आणि शेन यांच्या एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत त्यांच्यासाठी एक खास नोट लिहिली आहे. त्यानं या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘हे एक बाय- बाय डिनर होतं. शेन एक महिन्यासाठी परदेशात जात आहे आणि आलिया त्याच्यासाठी खूप दुःखी आहे.’ अनुराग कश्यपच्या या पोस्टवर अनेक सेलेब्सनी कमेंट केल्या आहेत. एवढंच नाही तर चाहत्यांनी अनुरागला सर्वोत्तम वडील असा टॅग दिला आहे.
आणखी वाचा- कथित गर्लफ्रेंड सबा आझादसाठी हृतिक रोशनची पहिली पोस्ट, म्हणाला…
अनुरागची मुलगी आलिया कश्यप तिच्या खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. बॉयफ्रेंड शेनसोबतचे फोटो ती बरेचदा सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. आलिया आणि शेन यांची लव्ह स्टोरी खूप खास आहे. दोघांची ओळख एका डेटिंग अॅपच्या माध्यमातून झाली होती. तेव्हापासून दोघंही एकमेकांसोबत आहेत. मागच्या बऱ्याच वर्षांपासून दोघंही एकमेकांना डेट करत आहेत.