director gautham menon sid rrr film is not oscar material rnv 99 | "'RRR' हा ऑस्कर मटेरियल चित्रपट...", दिग्दर्शक गौतम मेनन यांनी व्यक्त केली शंका | Loksatta

“‘RRR’ हा ऑस्कर मटेरियल चित्रपट…”, दिग्दर्शक गौतम मेनन यांनी व्यक्त केली शंका

दिग्दर्शक गौतम मेनन यांनी प्रतिक्रिया देत ‘आरआरआर’ आणि ‘छेल्लो शो’ या दोन्ही चित्रपटांबाबत शंका उपस्थित केली आहे.

“‘RRR’ हा ऑस्कर मटेरियल चित्रपट…”, दिग्दर्शक गौतम मेनन यांनी व्यक्त केली शंका

गेले काही दिवस ऑस्कर नॉमिनेशन्स हा सर्वत्र चर्चेत असलेला विषय आहे. काही दिवसांपूर्वी राजामौली यांच्या ‘आरआरआर’ चित्रपटाची ऑस्करसाठी निवड होण्याची दाट शक्यता असल्याचे बोलले जात होते. पण पॅन नलिन दिग्दर्शित ‘छेल्लो शो’ चित्रपटाची ऑस्करसाठी निवड करण्यात आली. त्यामुळे एका वेगळा वाद सुरु झाल्याचे दिसून येत आहे. या सगळ्यावर दिग्दर्शक गौतम मेनन यांनी प्रतिक्रिया देत ‘आरआरआर’ आणि ‘छेल्लो शो’ या दोन्ही चित्रपटांबाबत शंका उपस्थित केली आहे.

आणखी वाचा : “आताची वेळ चांगली, कारण…”, ऐश्वर्या रायने बॉलिवूड विरुद्ध दाक्षिणात्य चित्रपट वादावर दिली प्रतिक्रिया

नुकत्याच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये गौतम यांनी ऑस्कर निवडीबद्दलचे त्यांचे मत व्यक्त केलं आहे. ते म्हणाले, ऑस्करसाठी निवड झालेला ‘छेलो शो’ हा चित्रपट मी अजून पाहिलेला नाही. ‘छेल्लो शो’ आणि ‘आरआरआर’ या दोन्ही चित्रपटांविषयी मी खूप काही ऐकले आहे. निवड झालेल्या चित्रपटाला जर ऑस्कर मिळाला तर आनंदच होईल. पण ‘छेल्लो शो’ आणि ‘आरआरआर’ या चित्रपटांच्याऐवजी दुसऱ्या एखाद्या चित्रपटाला संधी देण्याची गरज होती.”

पुढे ते म्हणाले, “आपला चित्रपट ऑस्करला जावा ही जिद्द आपल्यात कुठेतरी कमी आहे असं मला वाटतं. ‘आरआरआर’ हा ऑस्कर मटेरियल चित्रपट आहे याबद्दल मला अजूनही शंका आहे.” गौतम मेनान यांनी दिलेली ही प्रतिक्रिया खूप चर्चेत आली आहे. या त्यांच्या वक्तव्यावर अनेकजण प्रतिक्रियाही देताना दिसत आहेत.

हेही वाचा : ऑस्करमध्ये गेलेल्या ‘छेल्लो शो’ चित्रपटाचा ट्रेलर पाहिलात का? जाणून घ्या कथा, विषय, रिलीज डेट अन् बरंच काही!

तर दुसरीकडे फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने ‘छेल्लो शो’ हा चित्रपट एका इटालियन ऑस्कर विजेत्या चित्रपटाची कॉपी असल्याचा आक्षेप घेत या चित्रपटाच्या ऑस्कर निवडीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा ‘आरआरआर’च्या नावाची चर्चा सुरु झाली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
आनंद दिघेंनी सुरु केलेल्या टेंभी नाक्यावरच्या देवीचं प्रसिद्ध अभिनेत्री तितिक्षा तावडेने घेतलं दर्शन

संबंधित बातम्या

जूही चावलाने आमिर खानला किस करण्यास दिला होता नकार; सेटवरच तिने…
महेश मांजरेकर यांची लेक सई करतेय प्रसिद्ध निर्मात्याच्या मुलाला डेट?
“नाझी आणि हिटलरबद्दल मला प्रेम वाटतं कारण…” कान्ये वेस्टचे वादग्रस्त वक्तव्य
इतक्यात आजी होण्याची इच्छा नाही- सुप्रिया पिळगावकर
‘बाहुबली’च्या अवंतिकाबद्दल या पाच गोष्टी माहिती आहेत का?

व्हिडिओ

ताज्या बातम्या
नेपाळची बस सावंतवाडी बावळट येथे कलंडली
आरोग्य वार्ता : लठ्ठ महिलांना ‘लाँग कोविड’ची शक्यता अधिक
बिहारी मजुरांच्या जोरावर द्राक्षमळे सांगलीत दहा हजारांवर बिहारी मजूर
विश्लेषण : ‘निविदा’ जिंकली म्हणजे नेमके काय?
“महाराष्ट्राच्या दोन मंत्र्यांनी बेळगावला येणं अनुकूल नाही”, कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मईंचा इशारा