एकांकिका स्पर्धा म्हणजे कलाकारांचं महत्वाचं व्यासपीठ. मुंबई, पुणे यांसारख्या विविध शहरात अनेक एकांकिका स्पर्धांचं आयोजन केलं जातं. पुणे शहरात ‘पुरुषोत्तम करंडक’ ही एकांकिका स्पर्धा मानाची मानली जाते. विविध शहरांतून या एकांकिका स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी मुलं सहभागी होत असतात. ‘सर्वोत्कृष्ट एकांकिका’ पारितोषिक कोण पटकवणार यासाठी महाविद्यालयांमध्ये चुरस पहायला मिळते. पण यावर्षी ‘पुरुषोत्तम करंडक’ स्पर्धेचा आश्चर्यकारक निकाल लावण्यात आला. त्यावरून कलाविश्वात नाराजीचा सूर उमटला आहे. त्यामुळे दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी याने यावर्षी ‘पुरुषोत्तम करंडक’मध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांसाठी पुढाकार घेत एक पोस्ट शेअर करत त्याने स्पर्धकांसाठी घेतलेला निर्णय जाहीर केला आहे.

आणखी वाचा : शिल्पा नवलकरने केला निर्मात्यावर ‘सेल्फी’ची कथा चोरी केल्याचा आरोप, सुरु झाला नवा वाद

निपुणने सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये लिहिले, “पुरुषोत्तम करंडकामुळे मला नाटकाची आवड निर्माण झाली. या स्पर्धेने जे प्रोत्साहन दिलं ते आजही पुरून उरतं. त्याचा यावर्षी असा निकाल लागला याने फार वाईट वाटलं. हे चूक-बरोबर हा वाद घालून आता काही साध्य होणार नाही, पण नुसतं गप्पं राहून पण चालणार नाही. पुरुषोत्तम २०२२ मध्ये भाग घेतलेल्या प्रत्येक महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांसाठी मी एक नाट्य कार्यशाळा घ्यायचं ठरवलं आहे. ऑक्टोबरमध्ये असेल. याचे तपशील देईनच, पण ही कार्यशाळा मोफत असेल.”

हेही वाचा : वैदेही परशुरामी दिसणार नव्या भूमिकेत, पहिल्यांदाच शेअर करणार ‘या’ अभिनेत्याबरोबर स्क्रीन

नेमकं घडलं काय?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावर्षी झालेल्या ‘पुरषोत्तम करंडक’ एकांकिका स्पर्धेत परीक्षकांना एकही एकांकिका ‘पुरषोत्तम करंडक’च्या दर्जाची वाटली नाही म्हणून त्यांनी सर्वोत्कृष्ट एकांकिकेचं पारितोषिक कोणत्याही संघाला दिले नाही. थोडक्यात काय तर परीक्षकांच्या मते एकही एकांकिका पुरषोत्तम करंडकासाठी पात्र नाही. या स्पर्धेत जो संघ पहिला येतो त्याला पुरषोत्तम करंडक देण्यात येतो. या स्पर्धेची सुरवात १९६३ सालापासून करण्यात आली आहे. २०१० सालानंतर या स्पर्धेची व्याप्ती वाढवण्यात आली.