बॉलिवूड अभिनेता आमिर खानने (Aamir Khan) तब्बल चार वर्षांनंतर ‘लाल सिंग चड्ढा’ (Lal Singh Chaddha) चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पुनरागमन केलं. ११ ऑगस्टला आमिरचा हा बहुचर्चित चित्रपट बॉक्स ऑफिसवर दाखल झाला. प्रदर्शनापूर्वीच चित्रपटाबाबत नकारात्मक चर्चा सुरु होत्या. ‘बॉयकॉट लाल सिंग चड्ढा’ या ट्रेंडबाबत तर आमिरने स्वतः प्रतिक्रिया दिली होती. शिवाय चित्रपट पाहण्यासाठी देखील त्याने प्रेक्षकांना आवाहन केलं. मात्र या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आणि हा चित्रपट आमिरच्या करकीर्दीतला सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट ठरला.

नुकतंच दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी चित्रपटाच्या अपयशाबद्दल आणि लोकांच्या आवडीनिवडीबद्दल खुलासा केला आहे. बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत राम गोपाल वर्मा म्हणाले, “फक्त समीक्षकच चित्रपट गांभीर्याने बघतात. प्रेक्षकांना आता काय पसंत पडेल याचा अंदाज लावणं कठीण झालं आहे. प्रेक्षकांची चित्रपटाबद्दलची आवड बदलत चालली आहे. बॉक्स ऑफिसची सद्यस्थिती फार बिकट आहे. कुणी विचार केला होता का की आमिर खानचा चित्रपट फ्लॉप ठरेल? जर आमिर खानलाच हिट चित्रपट द्यायचा फॉर्म्युला ठाऊक नाहीये तर बाकीच्यांचं सोडूनच द्या.”

आणखी वाचा : ‘लाइगर’ फ्लॉप झाल्यानंतर अभिनेत्री अनन्या पांडेने गाठलं थेट मथुरा, ‘हे’ आहे त्यामागचं कारण

याच मुलाखतीत राम गोपाल वर्मा यांनी ओटीटीवर प्रदर्शित होणारे चित्रपट आणि वेबसीरिज याविषयीसुद्धा आपलं मत मांडलं आहे. ते म्हणतात, “बऱ्याच लोकांना ओटीटी हा पर्याय चित्रपटासाठी धोका वाटतो, पण मला वैयक्तिक युट्यूब ही माध्यम भयंकर आवडतं. त्यावर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज येत असतात. मी आता चित्रपट बघायला चित्रपटगृहात फार कमी जातो, ओटीटी ही माझ्यासाठी उत्तम सोय आहे.”

चार वर्षांनी चित्रपट घेऊन आलेल्या आमिरची अवस्था बिकट आहे. ‘फॉरेस्ट गंप’ या मूळ इंग्रजी चित्रपटाच्या रिमेकच्या हक्कांसाठी आमिर आणि त्याच्या टीमने तब्बल ८ वर्षं मेहनत घेतली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राम गोपाल वर्मा हे सध्या चित्रपटसृष्टीमध्ये सक्रिय नसले तरी त्यांची वक्तव्यं अधून मधून प्रचंड व्हायरल होतात. वादग्रस्त ट्वीटसाठी ते खासकरून ओळखले जातात. राम गोपाल वर्मा यांचा ‘डेंजरस’ नावाचा अत्यंत बोल्ड चित्रपट सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटात एका लेसबीयन जोडप्याची कथा मांडली असल्याने या चित्रपटावर प्रदर्शनासाठी बंदी आणली आहे. इतकंच नव्हे तर राम गोपाल वर्मा यांनी स्वतःचा ओटीटी प्लॅटफॉर्मही सुरू केला आहे.