पुन्हा एकदा जॅकलिन फर्नांडिसला EDने बजावला समन्स

या आधी दिल्लीत ईडीने जॅकलिनची ६ तास चौकशी केली होती.

jacqueline fernandez, ed, enforcement directorate,
या आधी दिल्लीत ईडीने जॅकलिनची ६ तास चौकशी केली होती.

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस चर्चेत आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी जॅकलीन फर्नांडिस ईडीच्या रडारवर सापडल्याने या चर्चा सुरु झाल्या होत्या. काही दिवसांपूर्वी ईडीकडून जॅकलीनची तपासणी करण्यात आली होती. तिहार कारागृहातून २०० कोटी रुपये वसूल करणारा सुकेश चंद्रशेखर प्रकरणी जॅकलीनची दिल्लीत ६ तास चौकशी करण्यात आली होती. दरम्यान, पुन्हा एकदा ईडीने जॅकलिनला समन्स बजावले आहे.

३० ऑगस्ट रोजी जॅकलीनची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर आता ईडीने पुन्हा एकदा जॅकलीनला समन्स बजावले आहे. ‘न्युज १८’ने दिलेल्या वृत्तानुसार, जॅकलीनला २५ सप्टेंबर रोजी ईडसमोर चौकशीसाठी हजर रहावे लागणार असल्याचे सांगितले जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘तिहार कारागृहातून २०० कोटी रुपये वसूल करणारा सुकेश चंद्रशेखर स्वत:ची खरी ओळख न सांगता जॅकलिनला फोन करत असे. तो स्पूफिंगद्वारे तिहार जेलमधून जॅकलिनला फोन करत असल्याचे म्हटले जात आहे. त्याने जॅकलिनला काही महागाड्या भेटवस्तू देखील गिफ्ट म्हणून पाठवल्या होत्या. पण चौकशीदरम्यान जॅकलिनने तिला भेटवस्तू पाठवणारी आणि फोन करणारी व्यक्ती जेलमध्ये असल्याची कल्पना देखील नव्हती’, असे जॅकलीन म्हणाली होती.

आणखी वाचा : मुलाच्या वाढदिवशी ट्विंकल खन्नाची खास पोस्ट, म्हणाली..

जॅकलीन सध्या ‘भूत पोलिस’ या तिच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट नुकताच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात जॅकलीनसोबत, यामी गौतम, सैफ अली खान आणि अर्जुन कपूर मुख्य भूमिकेत दिसत आहेत. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ed summons jacqueline fernandez second time in money laundering case dcp