बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक केके म्हणजेच कृष्णकुमार कुन्नथ यांच्या अकाली एक्झिटमुळे फक्त संगीत क्षेत्रच नाही तर संपूर्ण बॉलिवूडलाच मोठा धक्का बसला आहे. एकीकडे संपूर्ण इंडस्ट्री यावर दुःख व्यक्त करत असतानाच अभिनेता इमरान हाश्मीनं देखील केके यांच्या निधनानंतर भावूक प्रतिक्रिया दिली आहे. केके यांना इमरान हाश्मीचा आवाज मानलं जात असे. २६ वर्षांच्या बॉलिवूड करिअरमध्ये केके यांनी तमिळ, तेलुगू, मल्याळमसह इतरही काही भाषांमध्ये गाणी गायली. पण त्यांची सर्वाधिक गाणी इमरान हाश्मीच्या चित्रपटांसाठी गायली होती. इमरान आणि केके यांच्या जोडीला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली होती.

नक्की वाचा >> विश्लेषण : ‘नव्वद’ची पिढी नि ‘केके’चे गारूड… काय होते हे समीकरण?

केके यांच्या निधनामुळे इमरान हाश्मीला मोठा धक्का बसला आहे. त्यानं केके यांच्या निधनानंतर ट्वीटरवर एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. केके यांचा एक फोटो शेअर करताना इमराननं लिहिलं, “एक असा आवाज, एक असं टॅलेंट, ज्याच्यासारखी जादू दुसरं कोणीच दाखवू शकत नाही. आता त्याच्यासारखी गाणी गायलीही जात नाहीत. केके यांनी जी गाणी गायली त्यावर काम करणं माझ्यासाठी नेहमीच खास होतं. त्याच्यासारखा दुसरा कोणी होऊ शकत नाही. केके तुम्ही नेहमीच आमच्या हृदयात राहाल. तुमच्या गाण्यातून तुम्ही नेहमीच श्रोत्यांमध्ये जिवंत राहाल.”

आणखी वाचा- Video : कधी घाम पुसताना तर कधी पाणी पिताना दिसला ‘केके’, असे होते अखेरचे काही क्षण

केके यांनी इमरान हाश्मीसाठी ‘बीते लम्हे’, ‘तू ही मेरी शब है’, ‘जरा सी दिल में दे जगह तू’, ‘ऐ बेखबर’ , ‘दिल इबादत’, ‘जहरीली रातें’, ‘दिल इबादत’ आणि ‘ओ मेरी जान’ यांसारखी बरीच हीट गाणी दिली आहेत. ९० च्या दशकात एक असाही काळ होता जेव्हा इमरानच्या प्रत्येक चित्रपटासाठी केके गायचे. इमरानचा चित्रपट जरी हिट झाला नाही तरी केके यांची त्या चित्रपटातील गाणी नेहमीच हिट होत असत.

आणखी वाचा- KK Love Story : बालमैत्रिण ते पत्नी… अशी होती ‘केके’ची लव्ह स्टोरी!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान केके यांना कॉन्सर्ट दरम्यान जेव्हा त्रास होऊ लागला तेव्हा त्यांनी आयोजकांना स्पॉटलाइट बंद करण्यास सांगितलं. रात्री ८.३० वाजताच्या सुमारास केके यांनी लाइव्ह कॉन्सर्ट संपवलं आणि ते हॉटेलमध्ये परतले. मात्र त्यानंतर त्यांची तब्येत आणखी बिघडत गेली. त्यांना १०.३० वाजता कोलकाता मेडिकल रिसर्च इंस्टीट्यूटमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. यावेळी त्या ठिकाणी रुग्णालयाचे वरिष्ठ चिकित्सक, प्रशासकीय अधिकारी आणि वरीष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.