Entertainment News Update : ‘महावतार नरसिम्हा’ हा चित्रपट गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. अश्विन कुमार दिग्दर्शित पौराणिक अॅनिमेटेड चित्रपट ‘महावतार निरसिम्हा’ने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत १८० कोटींचा गल्ला जमावला आहे. या चित्रपटाला प्रदर्शित होऊन १९ दिवस झाले असून १९व्या दिवशी या चित्रपटाने किती कोटी कमावले हे जाणून घेऊयात.. ‘महावतार नरसिम्हा’ने १९व्या दिवशी म्हणजेच १२ ऑगस्ट रोजी बॉक्स ऑफिसवर ६.०० कोटींचा गल्ला जमावला आहे. तर १८व्या दिवशी या चित्रपटाने ५.२५ कोटींचं कलेक्शन केलं होतं. ‘महावतार नरसिम्हा’ हा चित्रपट एकूण पाच भाषांमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर मिळालेलं यश अनपेक्षित आहे. कारण सुरुवातीला हा चित्रपट तब्बल पाच भाषांमध्ये प्रदर्शित होऊनही पहिल्या दिवशी या चित्रपटाने फक्त १.७५ कोटी कमावले होते. नंतर हळूहळू प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल चर्चा व्हायला लागली आणि हा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात प्रेक्षकांनी गर्दी केली.
Pratik Gandhi On Phule Movie Failure : "सिनेमा लोकांपर्यंत पोहोचला नाही", प्रतीक गांधीने 'फुले' सिनेमाच्या अपयशाबद्दल खंत ...सविस्तर बातमी