Johnny Depp Vs Amber Heard: पायरेट्स ऑफ द कॅरेबियन चित्रपट अभिनेता जॉनी डेप त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. पूर्वाश्रमीची पत्नी एम्बर हर्डच्या विरोधात जॉनीने पुन्हा एकदा कोर्टात मानहानीचा अर्ज दाखल केल्याने ते दोघेही सातत्याने चर्चेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून जॉनी डेप आणि एम्बर हर्डचा सुरु असलेला मानहानीचा खटला जॉनी डेपने जिंकला आहे. त्यामुळे आता एम्बर हर्डला जॉनी डेपला १५ मिलियन डॉलर म्हणजे ११६ कोटी द्यावे लागणार आहे. तर दुसरीकडे सरसेनापती हंबीरराव या चित्रपटाचे राज ठाकरेंनी कौतुक केले होते. प्रसिद्ध पार्श्वगायक कृष्णकुमार कुन्नथ म्हणजेच ‘केके’चं मंगळवारी रात्री कोलकात्यामध्ये निधन झालं असून त्याच्या पार्थीवावर मुंबईमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

Live Updates
13:28 (IST) 2 Jun 2022
अक्षय कुमारला रिप्लेस करण्याबाबत कार्तिक आर्यनचं वक्तव्य चर्चेत; म्हणाला, “कोणी मला सुद्धा…”

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन सध्या त्याचा चित्रपट ‘भूल भुलैय्या २’मुळे चर्चेत आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधी कार्तिकची तुलना अक्षय कुमारसोबत केली जात होती. कारण या चित्रपटाच्या पहिल्या भागात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत होता. ‘भूल भुलैय्या २’ बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरल्यानंतर आता कार्तिक आर्यन लवकरच अक्षय कुमारला ‘हाऊसफुल’ फ्रँचाइजीमध्ये रिप्लेस करणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू आहेत. यावर कार्तिक आर्यननं प्रतिक्रिया दिली आहे.

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा

12:01 (IST) 2 Jun 2022
“मला ब्रेस्ट सर्जरी करण्यास सांगितलं होतं” प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

अभिनयाची कौटुंबीक पार्श्वभूमी नाही किंवा बॉलिवूडमध्ये कोणीही गॉडफादर नाही अशा अभिनेत्रींना कास्टिंग काऊचचे अनुभव आल्याचा खुलासा अनेकांनी केला आहे. याशिवाय बॉडी शेमिंगचाही सामना करावा लागल्याचेही अनुभव अनेक अभिनेत्रींनी शेअर केले आहेत. अशात आता आणखी एका अभिनेत्रीनं बॉडी शेमिंग आणि इंडस्ट्रीमध्ये काम करताना ब्रेस्ट सर्जरीचा सल्ला मिळाल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे.

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा

10:36 (IST) 2 Jun 2022
गायक ‘केके’ यांच्या मृत्यूचे कारण उघड, शवविच्छेदन अहवालातून माहिती समोर

प्रसिद्ध पार्श्वगायक कृष्णकुमार कुन्नथ म्हणजेच ‘केके’यांचे मंगळवारी (३० मे) रात्री कोलकात्यामध्ये निधन झाले. 'अभी अभी.. तो मिले हो, अभी न करो छूटने की बात…', 'हम रहे या ना रहे कल…', यासारख्या गाण्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा आवाज काळाच्या पडद्याआड गेला आहे. नुकतंच ‘केके’चा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे.

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

10:34 (IST) 2 Jun 2022
Johnny Depp Vs Amber Heard: जॉनी डेपच्या बाजूने कोर्टाचा निकाल, एंबर देणार ११६ कोटींची भरपाई

गेल्या काही दिवसांपासून जॉनी डेप आणि एम्बर हर्डचा सुरु असलेला मानहानीचा खटला जॉनी डेपने जिंकला आहे. त्यामुळे आता एम्बर हर्डला जॉनी डेपला १५ मिलियन डॉलर म्हणजे ११६ कोटी द्यावे लागणार आहे. सात न्यायाधीशांच्या खंडपीठाने याबाबतचा निकाल दिला आहे.

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

09:42 (IST) 2 Jun 2022
‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटाचं राज ठाकरेंकडून कौतुक, प्रवीण तरडेंनी सांगितला किस्सा

लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण विठ्ठल तरडे यांच्या बहुचर्चित ‘सरसेनापती हंबीरराव’ हा चित्रपट नुकताच चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या दोन महान छत्रपतींच्या काळात स्वराज्याचे सरसेनापती होण्याचा बहुमान मिळालेले एकमेव सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कथा या निमित्ताने प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. या सगळ्यात प्रवीण तरडेंनी नुकतीच एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत राज ठाकरेंसोबत झालेल्या बैठकीत झालेल्या चर्चेंविषयी सांगितले आहे

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा