Entertainment Breaking News Today 1 June 2025 : १ मे रोजी ‘गुलकंद’ आणि ‘आता थांबायचं नाय’ असे दोन मराठी चित्रपट एकाच दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. या दोन्ही सिनेमांना बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळाला. ‘गुलकंद’ आणि ‘आता थांबायचं नाय’ हे सिनेमे प्रदर्शित होऊन आता १ महिना उलटला आहे. त्यामुळे गेल्या ३१ दिवसांत या सिनेमांनी किती कमाई केली जाणून घेऊयात…

सई ताम्हणकर, समीर चौघुले, प्रसाद ओक, ईशा डे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘गुलकंद’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर ३१ दिवसांत ७.२९ कोटींचा गल्ला जमावला आहे. तर, ‘आता थांबायचं नाय’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर गेल्या महिन्याभरात ६.७७ कोटींची कमाई केली आहे.

Live Updates

Entertainment News Updates 1st June 2025

16:14 (IST) 1 Jun 2025

"माझ्या आईचं नवं दुकान…", सिद्धार्थ चांदेकरची आई झाली बिझनेसवुमन! अभिनेत्याची खास पोस्ट, सर्वत्र होतंय कौतुक…

Siddharth Chandekar Mother : सिद्धार्थ चांदेकरची आई सीमा चांदेकर यांनी सुरू केला नवीन व्यवसाय, अभिनेत्याने शेअर केली खास पोस्ट... ...सविस्तर वाचा
15:51 (IST) 1 Jun 2025

Miss World 2025 : १६ व्या वर्षी शरीरात कर्करोगाची गाठ ते विश्वसुंदरी…; यंदा कोणी जिंकला 'मिस वर्ल्ड'चा खिताब? जाणून घ्या…

Miss World 2025 चा मुकूट कोणी पटकावला?, स्तनाच्या कर्करोगासाठी महत्त्वपूर्ण काम, अधिक जाणून घ्या... ...वाचा सविस्तर
14:43 (IST) 1 Jun 2025

अखेर प्रतीक्षा संपली! CID 2 मध्ये शिवाजी साटम यांची एन्ट्री, पण असणार 'हा' ट्विस्ट, जाणून घ्या…

CID 2 मध्ये शिवाजी साटम यांची पुन्हा एन्ट्री, चाहत्यांचा आनंद गगनात मावेना, पाहा नवा प्रोमो ...वाचा सविस्तर
14:39 (IST) 1 Jun 2025

सूरज चव्हाणचा झाला साखरपुडा? चाहत्यांना दिला 'गुलीगत धोका'! 'तो' Video पाहून जान्हवी किल्लेकर म्हणाली…

Suraj Chavan : "अखेर आनंदाचा दिवस उजाडला...", सूरज चव्हाणने शेअर केला साखरपुड्याचा व्हिडीओ पण पुढे घडलं असं काही...; नेमकं सत्य काय? वाचा... ...सविस्तर वाचा
13:25 (IST) 1 Jun 2025

"बुरखा घालून परीक्षा दिली", किशोरी शहाणेंनी सांगितला किस्सा, म्हणाल्या, "समवयीन मुलं सतत बघायचे आणि…"

किशोरी शहाणेंनी बुरखा घालून दिलेल्या कॉलेजच्या परीक्षा, स्वत:च सांगितला किस्सा, म्हणाल्या, "समवयीन मुलं..." ...सविस्तर वाचा
12:23 (IST) 1 Jun 2025

"मी दहशतवादाचा बळी", अनुपम खेर यांनी व्यक्त केल्या भावना, म्हणाले, "मुंबईत २६/११ घडले तेव्हा…"

अनुपम खेर यांच्याकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक, २६/११ दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करत म्हणाले... ...वाचा सविस्तर
12:18 (IST) 1 Jun 2025

'हिरामंडी' फेम अभिनेत्री झाली आई, लग्नानंतर दोन वर्षांनी दिली गुडन्यूज, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

'हिरामंडी' फेम अभिनेत्रीच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव ...अधिक वाचा
11:56 (IST) 1 Jun 2025

'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्याने गुपचूप उरकलं लग्न! 'डेस्टिनेशन वेडिंग'चा Video केला शेअर, पत्नी काय काम करते? पाहा…

Niranjan Kulkarni Wedding : 'आई कुठे काय करते' फेम अभिनेता निरंजन कुलकर्णी अडकला विवाहबंधनात, शेअर केला खास व्हिडीओ ...वाचा सविस्तर
11:15 (IST) 1 Jun 2025

एका आर्टिस्टचं घर…; मराठी अभिनेत्याला लागली म्हाडाची लॉटरी! पत्नी अन् लेकीसह नव्या घरात गृहप्रवेश, पाहा फोटो…

मराठी कलाकार कुटुंबाला लागलं म्हाडाचं घर! अभिनेत्याचा पत्नी अन् लेकीसह नव्या घरात गृहप्रवेश, शेअर केली खास पोस्ट ...अधिक वाचा
09:12 (IST) 1 Jun 2025

Gulkand Marathi Movie Box Office Collection : सई ताम्हणकरच्या 'गुलकंद' चित्रपटाने ३१ दिवसांत जमावला 'इतक्या' कोटींचा गल्ला

Gulkand Marathi Movie Box Office Collection : सई ताम्हणकर, समीर चौघुले, प्रसाद ओक, ईशा डे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘गुलकंद’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर ३१ दिवसांत ७.२९ कोटींचा गल्ला जमावला आहे. ही कमाई अलीकडच्या काही दिवसांत प्रदर्शित झालेल्या मराठी सिनेमांच्या तुलनेत फारच चांगली आहे.

09:11 (IST) 1 Jun 2025

Ata Thambaycha Naay Box Office Collection : 'आता थांबायचं नाय' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर एका महिन्यात कमावले...

सिद्धार्थ जाधव, भरत जाधव, ओम भूतकर, पर्ण पेठे, आशुतोष गोवारीकर यांसारख्या दिग्गज कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका असलेला ‘आता थांबायचं नाय’ सिनेमा यंदा १ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमाचं सर्वत्र भरभरून कौतुक करण्यात येत आहे.

‘आता थांबायचं नाय’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर गेल्या ३१ दिवसांत ६.७७ कोटींची कमाई केली आहे. या सिनेमाला मराठी प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. याशिवाय सिनेविश्वातील अनेक दिग्गज मंडळींनी या चित्रपटाचं आणि दिग्दर्शक शिवराज वायचळ याचंही कौतुक केलं आहे.

 

Ata Thambaycha Naay & Gulkand Movie Updates in Marathi

मराठीसह बॉलीवूडमध्ये मे महिन्यात प्रदर्शित झालेल्या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली? सर्वत्र कौतुक होणाऱ्या सिद्धार्थ जाधव अन् भरत जाधव यांच्या 'आता थांबायचं नाय' सिनेमाने ३१ दिवसांत किती कोटी कमावले जाणून घ्या...