Latest Entertainment News Today 2 May 2025: अभिनेता जॅकी भगनानीने २००९ ला ‘कल किसने देखा है’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. त्याने त्यावेळी ६० किलो वजन कमी केले होते, त्यामुळे तो मोठ्या चर्चेत आला होता. २०१७ मध्ये असे समोर आले होते की त्याने फक्त २१ दिवसांत तब्बल १५ किलो वजन कमी केले आहे.
जॅकी भगनानीने नुकताच ‘स्क्रीन’ बरोबर संवाद साधला. त्यावेळी तो म्हणाला की शूटिंगसाठी गरज होती, म्हणून मी कमी वेळात इतके वजन कमी केले. मात्र, मी असा सल्ला कोणालाही देणार नाही. कारण, अशा अचानक झालेल्या बदलाचे शरीरावर घातक परिणाम होऊ शकतात.
याबरोबरच, नुकताच ‘आता थांबायचं नाय’, गुलकंद तसेच बॉलीवूड चित्रपट रेड २ हे चित्रपट नुकतेच प्रदर्शित झाले आहेत. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली आहे. अनुष्का शर्माने नुकातच ३७ वा वाढदिवस साजरा केला. आता त्यांचा अनसीन फोटो समोर आला आहे. तसेच मराठी मालिकांमध्ये वेगवेगळे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. आज दिवसभरातील मराठी सिनेमा, बॉलीवूड, दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील चित्रपट व टीव्ही मालिकांच्या सर्व अपडेट्स वाचा एका क्लिकवर…
Manoranjan News Updates: आजच्या दिवसभरातील सिनेसृष्टी आणि मालिकाविश्वातील अपडेट्स एका क्लिकवर जाणून घ्या...
प्रियांका चोप्राची तीन वर्षांची मुलगी मालती शिकतेय कराटे, पहिला बेल्टही मिळाला अन्…; निकने लेकीबद्दल सांगितल्या 'या' गोष्टी
"तो प्रत्येक वेळेस मला…", 'लक्ष्मी निवास' फेम सिंचना ऑनस्क्रीन नवऱ्याबद्दल म्हणाली, "आम्ही २३ तास ५९ मिनिटे…"
विजय देवरकोंडाने पहलगाम हल्ल्याबद्दल बोलताना केला आदिवासींचा उल्लेख, गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?
अंकिता लोखंडे आणि निया शर्माने 'या' गाण्यावर केला जबरदस्त डान्स, निमित्तही होतं खास, व्हिडीओ व्हायरल
तैमूरने 'आदिपुरुष' पाहून केलं असं काही की…; सैफ अली खानला मागावी लागली माफी, म्हणाला, "त्याने माझ्याकडे…"
"सलमान खान रात्री वेगळा…", मिका सिंग खुलासा करीत म्हणाला, "तर त्याला राग…"
रणबीर कपूरची बहीण रिद्धिमा कपूर करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण
रणबीर कपूरची बहीण रिद्धिमा कपूर नेटफ्लेक्सवरील 'द फॅब्युलस लाईव्हज ऑफ बॉलीवूड वाइव्हज' या कार्यक्रमात ती दिसली होती.
आता लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचा तिने खुलासा केला आहे. सध्या ती शूटिंग करत असल्याचे तिने म्हटले. तसेच, हे शूटिंग जूनपर्यंत सुरू असणार आहे, असेही रिद्धिमा कपूर म्हणाली.
"…तर तुला भारतरत्न देईन", हेमंत ढोमेने सांगितला सासऱ्यांचा किस्सा; म्हणाला, "त्यांनी लग्नाआधीच सांगितलं…"
"…म्हणून आमचा घटस्फोट झाला", रवीना टंडनच्या भावाची पहिली बायको खुलासा करत म्हणाली…
"मी इंडस्ट्रीच्या बाहेरची…", दीपिका पादुकोणचं मोठं वक्तव्य; पदार्पणाच्या चित्रपटाचा उल्लेख करत म्हणाली…
प्रसिद्ध अभिनेत्याचे यकृताच्या आजाराने निधन, ४९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
मल्याळम अभिनेते विष्णू प्रसाद यांचे शुक्रवारी पहाटे कोची येथील एका खाजगी रुग्णालयात निधन झाले. ते ४९ वर्षांचे होते. समोर आलेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपासून ते यकृताशी संबंधित आजारावर उपचार घेत होते. त्यांचे सह-कलाकार किशोर सत्या यांनी सोशल मीडियावर विष्णू प्रसाद यांच्या निधनाबाबत पोस्ट केली आहे.
परेश रावलनंतर बॉलीवूड अभिनेत्रीचं लघवी पिण्याबद्दल वक्तव्य; फायदे सांगत म्हणाली, "त्वचेवर सुरकुत्या..."
सिद्धार्थ चांदेकरच्या घरात नवीन सदस्याचे आगमन; फोटो शेअर करत म्हणाला...
अभिनेता सिद्धार्थ चांदेकरच्या घरात एका नवीन सदस्याचे आगमन झाले आहे. सिद्धार्थने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. मिताली व सिद्धार्थने नवीन श्वान आणले आहे. त्याचे नाव पिकू असे आहे,
सोशल मीडियावरील फोटोंमध्ये मिताली व सिद्धार्थ त्याच्या श्वानांबरोबर दिसत आहे.
https://www.instagram.com/p/DJJAqIIIGCv/?utm_source=ig_web_copy_link
'नवरी मिळे हिटलरला' फेम अभिनेत्रींनी शेअर केला 'तो' व्हिडीओ; मालिकेतील आजी म्हणाल्या, "मातृभाषेला आपल्या आईप्रमाणे…"
"पुष्पा’मुळे आता सगळेच मला…”, अल्लू अर्जुनच्या आयुष्यात झाला मोठा बदल; म्हणाला, "कित्येकजण माझा चेहरा…"
सूर्याच्या 'रेट्रो' चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद; पहिल्याच दिवशी केली 'इतक्या' कोटींची कमाई
दाक्षिणात्य अभिनेता सूर्याची प्रमुख भूमिका असलेला रेट्रो हा चित्रपट १ मे २०२५ ला प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे.
सॅल्कनिकनुसार, या चित्रपटाने पहिल्याच दिवशी १९.३३ कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे, आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काय कमाल करणार हे पाहणे महत्वाचा ठरणार आहे.
मंजिरी ओकला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत अमृता खानविलकर म्हणाली, "तू मला आणि माझ्या आयुष्याला..."
अभिनेत्री अमृता खानविलकरने मंजिरी ओकसाठी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने मंजिरी ओकला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
शुभेच्छा देताना अमृता खानविलकर म्हणाली की तू माझ्यासाठी खास आहे. तू मला आणि माझ्या आयुष्याला अजून चांगलं बनवलं आहेस, असे म्हणत प्रेम व्यक्त केले.
https://www.instagram.com/p/DJI-_S0zi3j/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==
"त्यांच्यापासून दूर राहण्यात…", पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्यात आल्यानंतर जॅकी श्रॉफ यांची प्रतिक्रिया, म्हणाले…
"मी मुंबई सोडली", अभिनेत्री अनुष्का शर्मा 'या' अरब देशात झाली शिफ्ट; म्हणाली, "काही कठीण निर्णय..."
"बहुतांश अमराठी चोर, लुटारू…", मराठी अभिनेत्याची महाराष्ट्र दिनानिमित्त पोस्ट; म्हणाला, "कष्टाच्या कमाईने घेतलेल्या…"
'तुला शिकवीन चांगलाच धडा' फेम शिवानी रांगोळेची छाया कदम यांच्यासाठी खास पोस्ट; म्हणाली, "एकत्र काम केलेलं नसूनही…"
काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ ला दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात २६ पर्यटकांना जीव गमवावा लागला. त्यानंतर भारत सरकारने काही कठोर निर्णय घेतले आहेत. अनेक पाकिस्तानी कलाकारांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर भारतात बंदी घातली आहे. हानिया आमिर ही त्या कलाकारांपैकी एक आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या या निर्णयाचा पुन्हा एकदा विचार करावा, अशी विनंती हानिया आमिरने केली आहे, असे म्हटले जात होते. आता पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरने त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. तिने तिच्या इन्स्टाग्रामवर अकाउंटवर याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. मी अशी कोणतेही विधान केले नसून माझ्या नावावर अशी खोटी विधाने पसरवली जात आहेत, असे तिने तिच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

"…म्हणून लोकांना माझ्याबद्दल गैरसमज आहे", निक्की तांबोळीचं भाष्य म्हणाली, "मी खूप अहंकारी…"
"मला स्कर्ट घालायला सांगितला अन्…", स्क्रिप्ट पाहताच शाहरुख खानने नाकारला होता करण जोहरचा चित्रपट
बिपाशा बासूने शेअर केला लेकीसह व्हिडीओ; नेटकरी म्हणाले...
बिपाशा बासू व करण सिंह ग्रोवर हे जोडपे सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. बिपाशाने नुकताच सोशल मीडियावर लेकीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती करण सिंह ग्रोवर व मुलगी देवीसह दिसत आहे. तिघेही मजा करत असून आनंदी असल्याचे दिसत आहे.
बिपाशाने शेअर केलेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट करीत त्यांचे कौतुक केले आहे. "गोड", "सुंदर", "देवी खूप उत्सुक आहे", "खूप छान कुटुंब आहे", अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहे.
https://www.instagram.com/reel/DJHtjS8yTmt/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==
Raid 2 ची धमाकेदार सुरुवात, ठरला यंदाचा सर्वाधिक ओपनिंग करणारा तिसरा चित्रपट, पहिल्या दिवशी कमावले तब्बल...
संजय दत्तच्या 'द भूतनी' चित्रपटाने पहिल्या दिवशी फक्त 'इतकी' केली कमाई
बॉलीवूड अभिनेता संजय दत्त व मौनी रॉय यांचा 'द भूतनी' हा चित्रपट १ मे २०२५ ला प्रदर्शित झाला. मात्र, या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचे दिसत आहे. सॅल्कनिकनुसार, या चित्रपटाने फक्त ६५ लाखांची कमाई केली आहे.
अनुष्का शर्मा व विराट कोहलीचा अनसीन फोटो पाहिलात का?
अनुष्का शर्माने नुकताच ३७ वा वाढदिवस साजरा केला. विराट व अनुष्का हे लोकप्रिय जोडपे आहे. आता त्यांचा अनसीन फोटो समोर आला आहे. त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. विराटने त्याच्या सोशल मीडियावर फोटो शेअर केला आहेत.
https://www.instagram.com/p/DJG30gLyiNA/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==
Zapuk Zupuk: 'झापुक झुपूक'ने सातव्या दिवशी कमावले ५ लाख, एका आठवड्याचे कलेक्शन किती? वाचा...
अनुष्का शर्मा (फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम)
आजच्या दिवसभरातील सिनेसृष्टी आणि मालिकाविश्वातील अपडेट्स एका क्लिकवर जाणून घ्या...