Entertainment News Updates 15 May : मनोरंजन क्षेत्रात सध्या केतकी चितळेने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट लिहून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर विखारी टीका केली आहे. त्यानंतर सीमा खान आणि सोहेल खान यांनी लग्नाच्या तब्बल २४ वर्षांनंतर एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. दोघांनीही न्यायालयात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला आहे. तर दुसरीकडे प्रवीण तरडे लिखित आणि दिग्दर्शित ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. याशिवाय औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेणाऱ्या अकबरुद्दीन ओवेसींचे रवीना टंडनने समर्थन केल्याच्या चर्चा सुरु आहेत.