अभिनेता अजय देवगणचा ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ हा चित्रपट १० जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलर प्रदर्शित होताच चाहत्यांमध्ये चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. आता हा चित्रपट प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे.
ओम राऊत दिग्दर्शित ‘तान्हाजी : द अनसंह वॉरियर’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशीच १५ कोटींची कमाई केली असल्याची माहिती चित्रपट व्यापार विश्लेषक राज बन्सल यांनी दिली आहे. प्रदर्शनापूर्वी चित्रपट पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर १० कोटींची कमाई करणार असल्याचे निष्कर्ष लावले जात होते. पण आता १५ कोटींची कमाई करत चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जादू केली आहे.
@ajaydevgn s #TanhajiTheUnsungWarrior collects ₹15Cr. Appox. on Day1
— RAJ BANSAL (@rajbansal9) January 10, 2020
‘तान्हाजी’ चित्रपटात अभिनेता सैफ अली खान, काजोल हे कलाकार मुख्य भूमिका साकारताना दिसत आहेत. हा चित्रपट अजय देवगणच्या संपूर्ण करिअरमधील १००वा चित्रपट आहे. तसेच या चित्रपटाच्या निमित्ताने सैफ आणि अजय ही जोडी तब्बल १३ वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर एकत्र पाहायला मिळाली. या चित्रपटात अभिनेता अजय देवगण तान्हाजींची भूमिका साकारली आहे तर तान्हाजी मालुसरे यांची पत्नी सावित्रीबाई मालुसरे यांची भूमिका काजोल साकारताना दिसत आहे. सैफ अली खान राजपुत मोघल किल्लेदार उदयभान राठोड यांच्या भूमिकेत दिसत आहे त्याचबरोबर मराठमोळा अभिनेता शरद केळकर शिवाजी महाराजांची भूमिका साकारत आहे तर राजमाता जिजाऊंची भूमिका पद्मावती राव करत आहेत.