‘मेगा ब्लॉकबस्टर’ या चित्रपटाची चाहते पहिल्या दिवसापासून आतुरतेने वाट पाहत आहे. क्रिकेटर रोहित शर्मा या चित्रपटातून मनोरंजनसृष्टीत पदार्पण करणार आहे. नुकताच या चित्रपटातील मुख्य कलाकारांचा फर्स्ट लूक आऊट करण्यात आला आहे.  या कलाकारांचा फर्स्ट लूक पाहिल्यानंतर चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दल उत्सुकता वाढली आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदान्ना दिसणार आहे. तर तिच्यासोबत टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि कॉमेडियन कपिल शर्मा देखील दिसणार आहेत.

आणखी वाचा : रितेश देशमुख आणि जेनिलियाने खरेदी केली नवी कोरी आलिशान गाडी, किंमत कोटींच्या घरात

रश्मिका मंदान्ना ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील बड्या अभिनेत्रींपैकी एक आहे. रश्मिका मंदान्नाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये ती मनमोहक शैलीत दिसत आहे. हा लूक शेअर करताना रश्मिका मंदान्नाने कॅप्शनमध्ये लिहिले, “मजेची गोष्ट”.

कॉमेडियन कपिल शर्माने ‘मेगा ब्लॉकबस्टर’ चित्रपटातील त्याचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. हे पोस्टर त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहे, ज्यावर चाहते कमेंट करत आहेत आणि त्याच्या लूकचे कौतुक करत आहेत.

या चित्रपटातील आपला लूक शेअर करताना रोहित शर्माने आपल्या बॉलिवूडमधील एंट्रीची माहिती दिली आहे. त्याच्या या लूकने सर्वांचे लक्ष वेधले असून तो सोशल मिडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

हेही वाचा : ‘पुष्पा २’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, चित्रीकरणाचा मुहूर्तही ठरला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘मेगा ब्लॉकबस्टर’ या चित्रपटात बॉलिवूड आणि टॉलिवूड स्टार्स एकत्र पडद्यावर दिसणार आहेत. रश्मिका मंदान्ना, रोहित शर्मा आणि कपिल शर्मा हे तिन्ही कलाकार या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. त्यामुळे हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी या तिघांचेही चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.