Friday OTT Theater Releases : शुक्रवार हा दिवस अभिनेत्यांपासून ते चित्रपट निर्मात्यांपर्यंत सर्वांसाठी खूप महत्त्वाचा असतो. कारण- दर आठवड्याला अनेक प्रमुख चित्रपट आणि सीरिज ओटीटी प्लॅटफॉर्मवर आणि थिएटरमध्ये प्रदर्शित होतात.
सप्टेंबरमधील तिसरा शुक्रवार प्रेक्षकांसाठी खूप खास असणार आहे. १९ सप्टेंबर २०२५ रोजी बॉक्स ऑफिसवर हिंदी-मराठी अनेक दमदार चित्रपट आणि वेब सीरिज प्रदर्शित होत आहेत. जास्त वेळ न घालवता, या शुक्रवारी ओटीटी आणि थिएटरमध्ये प्रदर्शित होणाऱ्या चित्रपट आणि सीरिजची संपूर्ण यादी पाहूया.
आतली बातमी फुटली
सिद्धार्थ जाधव अभिनीत ‘आतली बातमी फुटली’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. सिद्धार्थचा हा चित्रपट थिएटरमध्ये १९ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येईल. ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे, अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, अभिनेता सिद्धार्थ जाधव असे मराठीतले नामवंत चेहरे या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र आले आहेत.
जॉली एलएलबी ३
‘जॉली एलएलबी ३’च्या चित्रपटाची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. या यशस्वी फ्रँचायजीच्या तिसऱ्या भागात जॉलीची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. अक्षय कुमार, अर्शद वारसी व सौरभ शुक्ला यांचा कोर्टरूम ड्रामा, जॉली ‘एलएलबी ३’ शुक्रवार, १९ सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
द ट्रायल सीझन २
काजोल पुन्हा एकदा कायदेशीर कोर्टरूम ड्रामा सीरिज ‘द ट्रायल सीझन २’मध्ये नोयोनिका सेनगुप्ताची भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाली आहे. या सीरिजचा हा सीझन तुम्हाला शुक्रवार (१९ सप्टेंबर) पासून जिओ हॉटस्टारवर पाहायला मिळेल.
हाऊसमेट्स
हाऊसमेट्स हा एक तमीळ हॉरर कॉमेडी-ड्रामा चित्रपट आहे, ज्यामध्ये दर्शन, काली वेंकट व विनोधिनी मुख्य भूमिकांत आहेत. १ ऑगस्ट २०२५ रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट आता ओटीटी रिलीजसाठी सज्ज आहे. ही नवविवाहित जोडप्याची कथा आहे. जे त्यांच्या स्वप्नातील घरात राहतात; परंतु विचित्र घटना घडल्यावर त्यांचा आनंद भीतीत बदलतो. तुम्ही हा चित्रपट (१९ सप्टेंबर) पासून ZEE5 वर पाहू शकता.
पोलीस-पोलीस
ही कॉमेडी ड्रामा सीरिज इन्स्पेक्टर अर्जुनची कथा सांगते, जो रवी नावाच्या एका गुन्हेगाराला गुप्तपणे त्याच्या टीममध्ये भरती करतो. या सीरिजमध्ये सेंथिल कुमार, जयसीलन थंगवेल व शबाना शाहजहान यांच्या भूमिका आहेत. तुम्ही ही सीरिज (१९ सप्टेंबर) पासून जिओ हॉटस्टारवरदेखील पाहू शकता.
अजेय : द अनटोल्ड स्टोरी ऑफ अ योगी
‘अजेय : द अनटोल्ड स्टोरी ऑफ अ योगी’ हा चित्रपटदेखील प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. हा चित्रपट उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रवींद्र गौतम यांनी केले आहे. ही कथा शंतनू गुप्ता यांच्या ‘द मंक हू बीकेम चीफ मिनिस्टर’ या पुस्तकापासून प्रेरित आहे. हा चित्रपट तुम्ही शुक्रवारी (१९ सप्टेंबर) थिएटरमध्ये पाहू शकता.