‘गेम ऑफ थ्रोन्स’मधील आर्या स्टार्कच्या भूमिकेसाठी वाहवा मिळवणारी अभिनेत्री मेसी विल्यम्स सध्या भारतात आहे. ती मुंबईतील एका हॉटेलमध्ये उतरली आहे. तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे. खोलीतील भगवान कृष्णाचा फोटो, सजावट आणि तिला मिळालेल्या छोट्या भेटवस्तू पाहून ती खूप प्रभावित झाली आणि खूप आनंदी दिसत आहे. याशिवाय तिने आणखी काही फोटो शेअर केले आहेत.
या व्हिडिओमध्ये मेसी तिची हॉटेलमधली खोली दाखवताना दिसत आहे. खोलीत भिंतीवर श्रीकृष्णाच्या लावला आहे. तसेच खोलीत फुलांनी बनवलेली रांगोळी काढण्यात आली आहे. आणि ती म्हणते, ‘मी नुकतीच मुंबईला पोहोचले आहे आणि माझं डोकं थोडं खराब झालं आहे’. मग मेसी डायनिंग टेबलकडे जाते आणि भेटवस्तू दाखवते. ‘किती छोटे गिफ्टस म्हणत मेसी किंचाळताना दिसत आहे. ते गिफ्ट्स पाहून मेसी विल्यम्स आनंद झाल्याचे दिसून येत आहे.
गेम ऑफ थ्रोन्स ही मेसी विल्यम्सची पहिली मालिका आहे. यातूनच त्याने आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली आणि पहिली मालिकाच खूप गाजली. या मालिकेचा पहिला भाग २०११ मध्ये आला होता. आत्तापर्यंत या मालिकेचे एकूण ८ भाग आले आहेत.