आलिया भट्टची मुख्य भूमिका असलेला आणि संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपट मागच्या काही दिवसांपासून सातत्यानं चर्चेत आहे. प्रेक्षक या चित्रपटाची मागच्या वर्षभरापासून प्रतीक्षा करत असून लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण त्याआधी या चित्रपटातील अजय देवगणचा फर्स्ट लुक प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

आलिया भट्टच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटात अभिनेता अजय देवगणची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. या चित्रपटात तो गंगूबाई यांचा मानलेला भाऊ करीम लाला यांची भूमिका साकारत आहे. आज अजयचा या चित्रपटात फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला. यामध्ये अजय देवगण एका विंटेज कारच्या समोर काळा चष्मा आणि टोपी घातलेल्या वेशात दिसत आहे. त्याचा हा लूक सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय.

अजय देवगण ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटात करीम लाला यांची भूमिका साकारत आहे. काही मीडिया रिपोर्टनुसार अजय देवगणची या चित्रपटात फक्त २० मिनिटांची भूमिका आहे. मात्र ती चित्रपटाच्या कथेतील सर्वात महत्त्वाची भूमिका आहे. करीम लाला हे गंगूबाई यांचे मानलेले भाऊ होते. त्यामुळे चित्रपटातील अजय देवगणची भूमिका अतिशय महत्त्वाची असल्याचं बोललं जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटाचा ट्रेलर ४ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेय तर हा चित्रपट येत्या २५ फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांनी केलं असून चित्रपटात आलिया भट्ट, अजय देवगण यांच्या व्यतिरिक्त विजय राज, सीमा पहवा, जिम सार्भ आणि वरुण कपूर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.