दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘गंगूबाई काठियावाडी’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. येत्या २५ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. आलिया भट्टची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून त्याची बरीच चर्चा पाहायला मिळत आहे. यानंतर आता नुकतंच या चित्रपटातील पहिले गाणे रिलीज झाले आहे. यात आलियाच्या डान्सचे अनेक नेटकरी कौतुक करताना दिसत आहे.

‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटातील पहिले गाणे नुकतंच प्रदर्शित झाले आहे. ‘ढोलिडा’ असे या गाण्याचे नाव आहे. या पहिल्या गाण्यात आलिया भट्टचा जबरदस्त डान्स आणि स्टाइल पाहायला मिळत आहे. यात आलिया ही पांढऱ्या रंगाच्या साडीत ढोलच्या तालावर नाचताना दिसत आहे. या गाण्यात तिच्या आजूबाजूला अनेक महिला तिला डान्स करत चीअर करताना दिसत आहेत. हे गाणे एखाद्या जल्लोषाचे असल्याचे दिसत आहे.

‘ढोलिडा’ हे गाणे साहिल हाडने संगीतबद्ध केले आहे. तर हे गाणे जान्हवी श्रीमंकर गायले असून कृती महेशने हे गाणे कोरिओग्राफ केले आहे. अवघ्या काही तासांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या गाण्याला लाखो व्ह्यूज असल्याचे पाहायला मिळत आहे. या गाण्यात आलियाचे डान्सचे अनेकजण कौतुक करताना दिसत आहे. त्यासोबत अनेक नेटकऱ्यांनी आलियाला ट्रोलही केले आहे.

यात एका नेटकऱ्याने ‘रामलीला चित्रपटातील गाण्याप्रमाणे सेम डान्स केला आहे’, अशी कमेंट केली आहे. ‘अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या नगाडा गाण्याप्रमाणेच हा डान्स कॉपी केला आहे. पण आलिया यात छान दिसत आहे’, अशी कमेंट केली आहे. त्यासोबत काहीजणांनी ‘दीपिका पदुकोणपेक्षा या गाण्याला अधिक चांगला न्याय कोणीही देऊ शकत नाही’, असे म्हटले आहे.

“हा पुरुषार्थ आहे का?”, कर्नाटकातील हिजाब वादावर जावेद अख्तर यांची संतप्त प्रतिक्रिया

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आलिया भट्टची मुख्य भूमिका असलेला ‘गंगूबाई काठियावडी’ हा चित्रपट मुंबईतील कमाठीपुराच्या माफिया क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गंगूबाई यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांनी केलं आहे. अगदी कमी वयात स्वतःच्या नवऱ्यानंच कमाठीपुरामधील एका कोठ्यावर विकल्यानंतर अनेक संघर्ष करत गंगूबाई तिथल्या माफिया क्वीन कशा झाल्या, याची कथा आता मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे. या चित्रपटात अजय देवगण करीम लाला ही भूमिका साकारताना दिसणार आहे.