क्रुझवरील अमलीपदार्थांच्या पार्टीप्रकरणी अटकेत असलेला अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान सध्या आर्थर रोड तुरुंगात आहे. बुधवारी अमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळला. दरम्यान आर्यन खानच्या वकिलांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. काही दिवसांपूर्वी शाहरुखने आर्थर रोड तुरुंगात जाऊन आर्यनची भेट घेतली होती. आता लवकरच गौरी आर्यनची भेट घेणार आहे.

ड्रग्स प्रकरणात अटक झाल्यानंतर मुलगा आर्यनला शाहरुख पहिल्यांदा भेटला. शाहरुखने गुरुवारी आर्थर रोड या तुरुंगात जाऊन आर्यनची भेट घेतली होती. २५ ऑक्टोबर म्हणजेच आज शाहरुख आणि गौरी यांच्या लग्नाचा ३०वा वाढदिवस आहे. यंदाच्या वर्षी त्यांनी लग्नाचा वाढदिवस साजरा केला नाही. तर सतत प्रयत्न करूनही आर्यनची सुटका झाली नाही. या सगळ्यात आता गौरी आर्यनला भेटायला आर्थर रोड तुरुंगात त्याची भेट घेणार आहे.

आणखी वाचा : “एक आई आपल्या मुलाला…”, मलायकासोबतचा रोमँटिक फोटो शेअर केल्यामुळे अर्जुन झाला ट्रोल

केंद्रीय अमलीपदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) सादर केलेल्या पुराव्यांतून आर्यनसह या प्रकरणी अटक करण्यात आलेले सगळे आरोपी हे कटात सहभागी असल्याचे सकृतदर्शनी सहभागी असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे एनडीपीएस कायद्यानुसार कटात सहभाग असल्याचे कलम त्यांना लागू होते असे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले. तसेच आरोपींनी हा गुन्हा केलेला नाही असे या टप्प्यावर मानणे शक्य नसल्याचेही स्पष्ट केले.

आणखी वाचा : जात लपवण्यासाठीच वडिलांनी स्वीकारलं ‘बच्चन’आडनाव, अमिताभ यांचा खुलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विशेष न्यायालयाच्या निर्णयानंतर काही वेळातच आर्यनच्या वकिलांनी त्याच्या जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांच्यासमोर बुधवारी याचिका सादर करण्यासाठी आर्यनच्या वकिलांनी प्रयत्नही केला. मात्र न्यायालय उपलब्ध होऊ न शकल्याने याचिका गुरुवारी सादर करण्यात येणार आहे. तसेच याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली जाणार आहे.