दीपिका पदुकोण आणि सिद्धांत चतुर्वेदी यांच्या मुख्य भूमिका असलेला चित्रपट ‘गहराइयां’ ११ फेब्रुवारीला ओटीटी प्लॅटफॉर्म अमेझॉन प्राइम व्हिडीओवर रिलीज झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसत आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाची चर्चा आहे. अभिनेत्री दीपिकापासून ते दिग्दर्शक शकुन बत्रापर्यंत सर्वांनीच या चित्रपटाबाबत आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. पण आता चित्रपटाचे लेखक सुमित रॉयचे वडील चंदन रॉय यांनी या चित्रपटावर आपली प्रतिक्रिया देत आपल्या मुलाचं कौतुक केलं आहे.

चंदन रॉय यांनी ‘गहराइयां’चं एक पोस्टर शेअर केलं आहे. ज्यात वेगवेगळ्या पोर्टल्सनी केलेल्या समीक्षा दाखवण्यात आल्या आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं, ‘चित्रपट पाहा. माझा मुलगा सुमित या चित्रपटांच्या लेखकांपैकी एक आहे.’ चाहते त्यांची ही पोस्ट क्यूट असल्याचं म्हणत आहेत.

चंदन रॉय यांच्या या पोस्टवर अनेक युजर्सनी कमेंट केल्या आहेत आणि यामध्ये त्यांनी ‘चित्रपटात ‘F- वर्ड’चा वापर सातत्यानं का करण्यात आला? असा प्रश्न विचारला आहे. या प्रश्नाचं उत्तर देताना सुमितचे वडील चंदन यांनी लिहिलं, ‘मी माझ्या आसपासच्या युवापीढीला हा चार अक्षरी शब्द नेहमीच वापरताना पाहतो. त्यामुळे कोणला यात काही वेगळं वाटण्याचा काहीच संबंध नाही.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान या ‘गहराइयां’ चित्रपटाबाबत बोलायचं तर या चित्रपटाचं दिग्दर्शन शकुन बत्राचं आहे. तर निर्मिती करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शननं केली आहे. दीपिका पदुकोण, धैर्य कारवा, अनन्या पांडे आणि सिद्धांत चतुर्वेदी यांच्यासोबतच या चित्रपटात रजत कपूर आणि नसीरुद्दीन शाह यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. सध्या हा चित्रपट सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे.