भारतात ‘क्रिकेट’ खेळाचा उत्साह हा जणू एखाद्या सण-समारंभासारखाच असतो. मग तो क्रिकेटचा सामना राष्ट्रीय स्तरावरील असेल, तर भारताच्या विजयानंतर अगदी उत्सवी वातावरण असतं. मग प्रत्येक भारतीयाच्या आनंदाला उधाण येतं. असंच सध्या समस्त भारतीयांच्या आनंदाला उधाण आल्याचं पाहायला मिळत आहे आणि याचं कारण म्हणजे भारतानं चॅम्पियन्स स्पर्धेच्या अंतिम फेरीचा सामना जिंकून पटकावलेली विजेतेपदाची ट्रॉफी. भारतीय संघानं रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडचा पराभव करून ‘आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५’ (ICC Champions Trophy 2025) वर आपलं नाव कोरलं आहे आणि याच निमित्तानं सर्वत्र जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळत आहे. अनेक मराठी व हिंदी कलाकारांनीही या विजयानिमित्त आनंद साजरा केला आहे. अभिनेत्री जिनिलीया देशमुख (Genelia Deshmukh) हिनंही या विजयानिमित्त खास व्हिडीओ शेअर केला आहे.

जिनिलीयाने शेअर केला मुलांचा व्हिडीओ

जिनिलीया देशमुख (Genelia Deshmukh) सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती आपले अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करीत असते. तिच्या दोन्ही मुलांना खेळाची आवड आहे. जिनिलीयादेखील आपल्या मुलांची खेळाची आवड जपताना दिसते. ती अनेकदा त्यांना पाठिंबा देताना दिसते. अशातच नुकत्याच झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या (ICC Champions Trophy 2025) विजयावेळी रितेश-जिनिलीयाच्या दोन्ही मुलांनी आनंद साजरा केला. भारतीय संघाचा विजय होताच जिनिलीयाच्या दोन्ही मुलांनी बेडवर उड्या मारत आनंद व्यक्त केला. आपल्या मुलांचा हाच खास व्हिडीओ तिनं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे.

जिनिलीयाची सासूबाईंना मिठी अन् मुलांचा जल्लोष

या व्हिडीओमध्ये भारताचा विजय होताच जिनिलीयाची (Genelia Deshmukh) दोन्ही मुलं आनंदानं नाचू लागतात. तर जिनिलीया व तिच्या सासूबाईही आनंदानं टाळ्या वाजवतात. पुढे जिनिलीया आपल्या सासूबाईंना आनंदानं मिठीही मारते. एकूणच जिनिलीया, तिच्या सासूबाई व जिनिलीयाची दोन्ही मुलं भारताच्या विजयानिमित्त आनंद साजरा करताना या व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा खास व्हिडीओ शेअर करीत जिनिलीयानं “भारताच्या विजयासाठी सर्वांचे लक्ष लागून लागून राहिलेले आणि आता आपण चॅम्पियन्स झालो आहोत”, असंही म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
जिनिलीया देशमुख इन्स्टाग्राम स्टोरी व्हिडीओ

भारतीय संघाचे सर्व स्तरातून कौतुक

दरम्यान, १२ वर्षांनंतर, भारत पुन्हा एकदा या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा (ICC Champions Trophy 2025) हक्कदार बनला आहे. या अभूतपुर्व यशामुळे संपूर्ण देशात आनंदाचं आणि जल्लोषाचं वातावरण आहे. सर्वसामान्य लोकांपासून ते अनेक मोठमोठ्या सेलिब्रेटींपर्यंत अनेक जण आपला आनंद व्यक्त करत होते. एकूणच सोशल मीडियावर उत्सवाचं वातावरण दिसत आहे. अनेकांनी “टीम इंडियाचा अभिमान आहे”, “अभिनंदन टीम इंडिया, “विजयी भव:” अशा अनेक कमेंट्सद्वारे आपल्या आनंदी भावना व्यक्त केल्या आहेत.