‘पुष्पा’गर्ल रश्मिका मंदाना लवकरच ‘डीआयडी सुपर मॉम्स ३’ च्या ग्रँड फिनालेमध्ये दिसणार आहे. सध्या ती तिचा आगामी चित्रपट ‘गुडबाय’च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. ‘गुडबाय’मध्ये ती अमिताभ बच्चन यांच्यासह स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने ती ‘डीआयडी’ शोमध्ये पोहोचली होती. येथे तिने सुपरस्टार गोविंदा यांच्यासह धम्माल डान्स केला. दोघांचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.

‘डीआयडी सुपर मॉम्स ३’ फिनालेचा अधिकृत प्रोमो व्हिडिओ प्रदर्शित झाला आहे. या प्रोमो व्हिडिओमध्ये रश्मिका मंदाना आणि गोविंदा एकत्र डान्स करताना दिसत आहेत. या दोघांनी ‘पुष्पा’ चित्रपटाच्याच्या ‘सामी सामी’ या गाण्याच्या काही हुक स्टेप केल्या. गोविंदा हे एक उत्तम अभिनेताच नाही तर डान्सरही आहेत हे सर्वांनाच माहीत आहे. गोविंदा यांनी या गाण्यावर रश्मिकाच्या सर्व स्टेप हुबेहुब कॉपी करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.

आणखी वाचा-“चित्रपट चालणार की नाही हे मला…” ‘ब्रह्मास्त्र’च्या यशानंतर आलिया भट्टचं ‘ते’ वक्तव्य चर्चेत

प्रसिद्ध बॉलिवूड स्टार्स ‘डीआयडी सुपर मॉम्स 3’चे परीक्षक म्हणून काम पाहत आहेत. ज्यात कोरिओग्राफर रेमो डिसूझा, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आणि भाग्यश्री यांचा समावेश आहे. या आठवड्यात रश्मिका मंदाना आणि गोविंदा या शोमध्ये पाहुणे म्हणून दिसणार आहेत. दोघांनाही अशा प्रकारे स्टेजवर पाहणे हा चाहत्यांसाठी खरोखरच आनंदाचा क्षण आहे.

आणखी वाचा-“विचार करून बोलण्याची सवय लागली तर…” बॉयकॉट ट्रेंडवर गोविंदा यांची स्पष्ट प्रतिक्रिया

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान रश्मिका मंदानाचा ‘गुडबाय’ चित्रपट ७ ऑक्टोबर २०२२ ला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन अभिनेत्रीच्या वडिलांची भूमिका साकारत असून नीना गुप्ता तिच्या आईच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट विकास बहल यांनी दिग्दर्शित केला असून या चित्रपटातून रश्मिका बॉलिवूड पदार्पण करत आहे.