Govind Namdev On Shivangi Verma : अभिनेता गोविंद नामदेव गेल्या काही काळापासून चर्चेत आहेत. त्यांचे नाव ३० वर्षीय अभिनेत्री शिवांगी वर्माबरोबर जोडले गेले होते. असे म्हटले जात होते की ते दोघेही एकमेकांना डेट करत आहेत.
शिवांगीने त्यांच्या ‘गौरीशंकर गोहरगंज’ चित्रपटातील गोविंद यांच्याबरोबरचा एक बीटीएस फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला, तेव्हा या अटकळीला सुरुवात झाली, ज्यामध्ये कॅप्शन होते, ‘प्रेमाला वय नसते, मर्यादा नसते.’ यानंतर अभिनेत्रीने अभिनेत्याविरुद्ध काही शब्द बोलले, त्यानंतर आता अभिनेत्याने तिला चोख उत्तर दिले आहे.
गोविंद नामदेव यांनी अलीकडेच अभिनेत्री शिवांगी वर्माबरोबरच्या व्हायरल झालेल्या फोटोबद्दल बोलताना म्हटले की, हा एक पब्लिसिटी स्टंट होता. त्यांनी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शिवांगीबरोबर तो फोटो क्लिक केला होता. ७० वर्षीय गोविंद नामदेव यांनी ४० वर्षांनी लहान असलेल्या शिवांगीवर त्यांच्या नावाचा गैरवापर केल्याचा आरोप केला होता, त्यानंतर अभिनेत्रीने प्रत्युत्तर दिले होते. तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत लिहिले होते की, ‘कोणीतरी बरोबर म्हटले आहे, वाढत्या वयानुसार वृद्ध लोक वेड्यासारखे वागतात.’
आता शिवांगी वर्माच्या पोस्टवर गोविंद नामदेव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ७० वर्षीय अभिनेत्याने हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना म्हटले आहे की, एखाद्या व्यक्तीचे संगोपन कसे असते, त्याचे संस्कार कसे असतात, तो त्याच विचारसरणीचा माणूस असतो आणि त्यानुसार त्याचे जीवन पाहतो आणि लोकांशी व्यवहार करतो. त्यांची मानसिकता या गोष्टींमुळे तयार होते आणि ते जीवनाकडे पाहण्याच्या आणि इतरांशी संवाद साधण्याच्या दृष्टिकोनातून प्रतिबिंबित होते. ही संपूर्ण परिस्थिती त्याचेच प्रतिबिंब आहे. माफी मागण्याऐवजी ती गोष्टी कशा हाताळते हे तिच्या स्वतःच्या समजुतीवर अवलंबून आहे, मी अशा गोष्टींकडे जास्त लक्ष देत नाही.’
गेल्या वर्षी गोविंद नामदेव यांनी शिवांगी वर्माबरोबर ‘गौरीशंकर गौहरगंज’ चित्रपटात काम केले होते. याबद्दल अभिनेत्याने अलीकडेच सांगितले की, गेल्या वर्षी व्हायरल झालेला फोटो चित्रपटाच्या प्रमोशनसाठी काढला होता. परंतु, अभिनेत्रीने त्यांच्या परवानगीशिवाय तो फोटो सोशल मीडियावर चुकीच्या पद्धतीने पोस्ट केला, ज्यामुळे त्यांची प्रतिमा खराब झाली.
गोविंद यांनी गेल्या वर्षी सोशल मीडियावर स्पष्ट केले होते की, ते तिच्यापेक्षा ४० वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्रीला डेट करत नाहीयेत; पण तो चित्रपटाचा एक सीन होता. अलीकडेच ETimes ला दिलेल्या मुलाखतीत गोविंद नामदेव म्हणाले की, इतक्या वर्षांच्या मेहनतीने त्यांनी निर्माण केलेली प्रतिमा खराब झाली आहे. शिवांगीच्या वागण्यावर रागावल्यानंतर तिच्याशी बोलणे बंद केले होते असेही अभिनेत्याने म्हटले आहे.