सोशल मीडियावर एखादी गोष्ट ट्रेन्ड झाली की, ती सर्वत्र व्हायरल होते. अगदी रस्त्यावरच्या चहाच्या टपरीपासून ते मोठमोठ्या पार्ट्यांमध्ये सध्या एकच गाणं वाजतंय ते म्हणजे ‘गुलाबी साडी’. गेल्या महिन्याभरापासून संजू राठोडच्या ‘गुलाबी साडी’ या गाण्याने केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात धुमाकूळ घातला आहे. बॉलीवूड धकधक गर्ल माधुरी दीक्षितपासून ते अगदी आफ्रिकेच्या किली पॉलपर्यंत प्रत्येकाने या गाण्यावर जबरदस्त डान्स केल्याचं आपण गेल्या काही दिवसांमध्ये पाहिलं.

सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होणारं ‘गुलाबी साडी’ हे गाणं संजू राठोडने लिहिलं आहे. सामान्य माणसांपासून ते अगदी सेलिब्रिटींपर्यंत सगळेजण या गाण्यावर थिरकत आहेत. ‘गुलाबी साडी आणि लाली लाल लाल…दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ’ असे या गाण्याचे बोल आहेत. ज्या गाण्यावर माधुरी दीक्षितला रील्स करण्याचा मोह आवरला नाही. ते ‘गुलाबी साडी’ गाणं संजूने नेमकं कसं लिहिलं याबाबत त्याने ‘सकाळ’ला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे. संजू हा मूळचा जळगावचा असून कॉलेजपासून त्याला गाणी बनवण्याची आवड आहे.

हेही वाचा : सुरुची अडारकरच्या वाढदिवसानिमित्त पियुष रानडेची खास पोस्ट; बायकोबद्दल म्हणाला, “तुझ्या प्रेमामुळे…”

संजू म्हणाला, “‘गुलाबी साडी’ हे गाणं खरंतर मी दिवाळीच्या दिवशी लिहिलं होतं. सगळीकडे दिवाळीचा उत्सव सुरू असताना माझ्या डोक्यात काहीतरी नवीन करायचं अशी संकल्पना सुरू होती. माझ्या वैयक्तिक कारणांमुळे मी दिवाळीत घरी नव्हतो गेलो, एकटा राहत होतो.”

हेही वाचा : ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतील अभिनेत्रीला मातृशोक, पोस्ट शेअर करत म्हणाली, “आई खूप एकटी पडले गं…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आपण नवीन काहीतरी शोधूया असं मला सतत जाणवत होतं. त्यावर मी विचार केला… तेव्हा जाणवलं प्रेमाचा रंग म्हणजे ‘गुलाबी’ आणि त्यात माझं आधीच ‘नऊवारी साडी’ हे गाणं गाजलं होतं. त्यानंतर मग मी विचारू करून, दोन्ही गाण्यांचा मेळ साधून ‘गुलाबी साडी’ हे गाणं लिहिलं.” असं संजू राठोडने सांगितलं.