बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या आगामी हड्डी या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. हड्डी हा सिनेमा सप्टेंबर महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या ट्रेलरमधले नवाजुद्दीनच्या तोंडी असलेले डायलॉग्ज लक्ष वेधून घेत आहेत.

हड्डी या सिनेमात नवाजुद्दीन सिद्दीकीसह अनुराग कश्यपही दिसतो आहे. या ट्रेलरमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी ट्रान्सजेंडरच्या लुकमध्ये दिसतो आहे. नवाजुद्दीनने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन या सिनेमाचा ट्रेलर पोस्ट केला आहे. Has revenge ever looked this bone-chilling? अशी ओळही त्याने पोस्ट केली आहे. ७ सप्टेंबरला ZEE5 वर हा सिनेमा रिलिज होतो आहे.

नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अनुराग कश्यप यांच्यासोबतच हड्डी या चित्रपटामध्ये इला अरुण, मोहम्मद जीशान अय्यूब, सौरभ सचदेवा, श्रीधर दुबे, राजेश कुमार, विपिन शर्मा और सहर्ष शुक्ला या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे.

हड्डी हा चित्रपट ७ सप्टेंबर २०२३ रोजी झी-5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अक्षत अजय शर्मा यांनी केले आहे, तर झी स्टुडिओनं या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हड्डी या चित्रपटात अॅक्शन, ड्रामा पहायला मिळणार आहे, असा अंदाज या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर लावला जाऊ शकतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

द सेक्रेड गेम्समधल्या गणेश गायतोंडेच्या भूमिकेमुळे नवाजुद्दीन सिद्दीकी हा घराघरात पोहचला आहे. जगभरात ही सीरिज गाजली होती. तसंच त्याचे गँग्स ऑफ वासेपूर, तलाश, बजरंगी भाईजान, मांझी द माऊंटन मॅन, किक हे चित्रपटही विशेष गाजले होते. आता पहिल्यांदाच हड्डी सिनेमात नवाजुद्दीन सिद्दीकी ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत झळकणार आहे.