सध्या फितूर मधील कतरिना कैफच्या केसांचा नवा लूक सोशल मीडिया आणि फॅशन विश्वात चर्चेचा विषय बनला आहे. तिचा हा नवा लूक तिच्या आगामी ‘फितूर’ चित्रपटासाठी असून त्यासाठी निर्मात्याला तब्बल ५५ लाख रुपयांचा खर्च करावा लागल्याचे सांगण्यात येत आहे.
मिस मालिनी या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, या नव्या लूकसाठी कतरिनाला लंडनला जावे लागले. या नवीन लुकसाठी कतरिनाला भारतात एकही हेअर स्टाइलिस्ट पसंतीस आला नाही. त्यामुळे केवळ केसांना कलर करून घेण्यासाठी कतरिनाला काही दिवसांसाठी लंडनला राहावे लागले. कतरिनाच्या येण्या जाण्याचा आणि लंडनमध्ये राहण्याचा खर्च निर्मात्याला करावा लागावा इतपर्यंत तर ठीक आहे. पण, यावेळी तिच्यासोबत तिचा सेक्रेटरी असल्याने त्याच्याही राहण्याचा खर्च निर्मात्याच्या माथी पडला. त्यामुळे कतरिनाचे लाल केस निर्मात्यासाठी फारच महागाईत पडल्याचे दिसते.
कतरिना या चित्रपटात फिरदौसच्या भूमिकेत दिसणार असून आदित्य रॉय कपूर हा या चित्रपटात नूरची भूमिका साकारणार आहे. काश्मिरच्या पार्श्वभूमीवर असलेली ही प्रेम कहाणी प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारी आहे. चार्ल्स डिकेन्सच्या ‘ग्रेट एक्सपेक्टेशन्स’ या पुस्तकावर आधारित ”फितूर” हा चित्रपट १२ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.