बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर आजही सर्वाधिक चर्चेत राहणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहेत. ९० च्या दशकात लोकप्रिय ठरलेले अनिल कपूर फिटनेसच्या बाबतीत अनेक आघाडीच्या कलाकारांना टक्कर देताना दिसतात. आपल्या चित्रपटांसोबतच ते त्यांच्या खासगी आयुष्यामुळेही अनेकदा सोशल मीडियावर चर्चेत असतात. अनिल कपूर यांच्या दोन्ही मुलींची लग्न झाली आहेत. मात्र त्यांचा मुलगा मात्र अद्याप सिंगल आहे. पण अलिकडेच तो एका मुलीसोबत दिसला. ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

अनिल कपूर यांचा मुलगा हर्षवर्धन कपूर याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तो एका मुलीचा हात पकडून चालताना दिसत आहे. हर्षवर्धनच्या या व्हिडीओवर कमेंट करताना नेटकऱ्यांनी तिला ‘अनिल कपूर यांची सून’ असं संबोधलं आहे. अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट करताना ही मिस्ट्री गर्ल कोण आहे? असा प्रश्न देखील विचारला आहे. मात्र ती मुलगी कोण आहे याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. हर्षवर्धनचा हा व्हिडीओ विरल भयानी यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.

आणखी वाचा- Video: खिल्ली उडवणाऱ्या शाहरुख- सैफला निल नितिन मुकेशनं करुन दिली होती संस्कारांची आठवण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हर्षवर्धननं या व्हिडीओवर किंवा त्याच्यासोबत असलेली मुलगी कोण आहे यावर अद्याप कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही. व्हिडीओमध्ये हर्षवर्धन ब्लॅक आणि व्हाइट रंगाच्या व्हिडीओमध्ये टी-शर्टमध्ये दिसत आहे. तर त्याच्यासोबत असलेली मुलगी देखील कॅज्युअल आउटफिट्समध्ये दिसत आहे. हर्षवर्धन कपूरच्या कामाबद्दल बोलायचं तर २०१६ मध्ये त्यानं ‘मिर्जिया’ चित्रपटातून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर २०१८ मध्ये तो ‘भावेश जोशी सुपरहिरो’मध्ये दिसला होता.