नुकत्याच पार पडलेल्या ९४ व्या ऑस्कार पुरस्कार सोहळ्यात विल स्मिथनं होस्ट क्रिस रॉकला कानशिलात लगावल्याच्या प्रसंगाची बरीच चर्चा झाली. पत्नीच्या आजारपणाची खिल्ली उडवल्यानं चिडलेल्या स्मिथनं रॉकच्या कानाखाली मारल्यानं सर्वच हैराण झाले होते. पण हे सर्व हॉलिवूडमध्येच होतं असं नाही. अशा प्रकारच्या घटना आणि खिल्ली उडवण्याचे प्रकार बॉलिवूडच्या अवॉर्ड सोहळ्यातही घडल्या आहेत. ऑस्कर सोहळ्यातील या प्रसंगानंतर आता अभिनेता शाहरुख खान आणि निल नितिन मुकेश यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.

बॉलिवूडच्या चित्रपट पुरस्कारांमध्येही कलाकार आणि त्यांच्या कुटुंबीयांची खिल्ली उडवण्याची परंपरा आहे. असंच काहीसं अभिनेता निल नितिन मुकेशसोबतही घडलं होतं. मंचावर उभं राहून होस्टिंग करत असलेल्या शाहरुख खान आणि सैफ अली खाननं निल नितिन मुकेशची त्याचे वडील आणि आजोबा यांच्या नावावरून खिल्ली उडवली होती. पण निलनं अतिशय शांतपणे शाहरुख आणि सैफला त्यांच्या संस्कारांची आठवण करून देत बोलती बंद केली होती.

आणखी वाचा- Oscar 2022: “मला माफ करा…”, क्रिस रॉकच्या कानशिलात लगावल्यानंतर विल स्मिथची पहिली प्रतिक्रिया

या व्हिडीओमध्येही दिसतंय की, शाहरुख खान आणि सैफ अली खान एका पुरस्कार सोहळ्याचं होस्टिंग करत आहेत. त्यावेळी प्रेक्षकांमध्ये बसलेल्या निल नितिन मुकेशला ते म्हणतात की, ‘तुला एक प्रश्न विचारायचा आहे. तुझं नाव निल नितिन मुकेश आहे. पण तुझं आडनाव कुठे आहे? ही सर्व पहिली नावं आहेत. तुझं काही आडनाव का नाहीये? जसं आमच्या सर्वांचं आहे.’

शाहरुखचं बोलणं ऐकल्यावर तिथे उपस्थित असलेले सर्व कलाकार हसू लागतात. मात्र निलला ही गोष्ट आवडत नाही. तो शांतपणे शाहरुखला उत्तर देताना म्हणतो, ‘खूपच चांगला प्रश्न आहे सर, धन्यवाद. पण मी शाहरुख आणि सैफ सरांच्या परवानगीने काही बोलू शकतो का?’ नंतर तो म्हणतो, ‘मला खरं तर असं वाटतं की हा एक प्रकारचा अपमान आहे. हे ठीक नाहीये. तुम्ही विचारलेला हा प्रश्न खूपच वाईट आहे. माझे वडील इथे माझ्या बाजूला बसलेले आहेत आणि अशावेळी असं सेटच्या पोडियममध्ये उभं राहून स्वतःची खिल्ली उडवून घेणं खूपच चुकीचं आहे.’

आणखी वाचा- “…म्हणून घेतली होती वशीकरण आणि काळ्या जादूची मदत” प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निल शाहरुख आणि सैफला पुढे सांगतो, ‘मी माफी मागतो. पण मला वाटतं हा माझा अपमान आहे. तुम्ही दोघांनीही आता गप्प बसायला हवं. मला कोणत्याही आडनावाची गरज नाहीये मी आज इथे आहे कारण मी वर्षं मेहनत केली आहे. लोक मला माझ्या कामामुळे ओळखत आहेत. आज मी पहिल्या १० ओळींमध्ये बसलोय आणि मला शाहरुख खान आण सैफ अली खान यांच्याकडून प्रश्न विचारला जात आहे. पण तुम्ही दोघं आता गप्प बसा.’ यावेळी निलनं शाहरुख खानला रागात कानशिलात लगावली तर नाही पण शांतपणे उत्तर देत आपल्या संस्कारांची आठवण नक्कीच करून दिली होती.