बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. प्रियांकाने अमेरिकन गायक निक जोनसशी लग्न केले. या दोघांची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. प्रियांका चोप्रा ही नेहमी विविध कार्यक्रमात गळ्यात मंगळसूत्र परिधान करताना दिसते. एखाद्या गाऊनवर, जिन्स-टॉपवर किंवा ड्रेसवर ती अनेकदा मंगळसूत्र घालताना दिसते. नुकतंच प्रियांकाने तिच्या मंगळसूत्र परिधान करण्याबद्दलच्या नेमक्या भावना काय आहेत? याबद्दल सांगितले आहे.

प्रियांकाने नुकतंच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात तिने अमेरिकन गायक निक जोनसशी लग्न केल्यानंतर जेव्हा त्याने पहिल्यांदा मंगळसूत्र घातलं, त्यावेळीच्या आठवणी शेअर केल्या आहेत. तसेच तिने पहिल्यांदा मंगळसूत्र घातलं तेव्हा तिला कसं वाटलं हे देखील तिने सांगितले आहे. विशेष म्हणजे तिच्या आयुष्यात मंगळसूत्राला इतके महत्त्व का आहे? याचीही माहिती तिने दिली आहे.

प्रियांका चोप्राने तिच्या इंस्टाग्राम पेजवर एका ज्वेलरी ब्रँडच्या ब्रँड एंडोर्समेंटचा व्हिडीओ शेअर केला आहे. यावेळी प्रियांका चोप्रा म्हणाली की, “मला अजूनही चांगले आठवतंय की जेव्हा माझा निक पहिल्यांदा मला मंगळसूत्र घालत होता तेव्हा मला फार चांगलं वाटत होते. याचे मुख्य कारण म्हणजे मी लहानपणापासूनच याचा अर्थ जाणून घेत मोठी झाली आहे.”

“माझ्यासाठी तो खूप महत्त्वाचा क्षण होता. पण त्यासोबतच एक मॉर्डन स्त्री म्हणून मला त्याचे परिणाम काय होतील हे देखील कळत होते. मला मंगळसूत्र घालायला आवडते की ही सुद्धा एक पितृसत्ताक गोष्ट आहे? पण त्यासोबतच मी अशा पिढीतील आहे जी याच्यामध्ये कुठेतरी आहे. मला परंपरा पाळायला आवडते. पण त्यासोबतच आपण काय आहोत, हेही मला माहित असते. आम्ही कुठे उभे आहोत हे आम्हाला ठाऊक आहे. आपल्या पुढच्या पिढीतील मुली यापेक्षा काहीतरी वेगळं करताना दिसतील,” असेही ती म्हणाले.

यावेळी तिला प्रश्न विचारला की, ‘तू भूतकाळातील परंपरा पुढे नेण्याचा प्रयत्न करतेस का?’ त्यावर ती म्हणाली, “हे निश्चित एका अर्थाने संभाषण पुढे नेण्याचा मार्ग आहे. तुम्ही कोण आहात आणि तुम्ही कशाचे प्रतिनिधित्व करता हे समजून घेऊन तुम्ही तुमच्या परंपरा चालू ठेवा,” असेही तिने सांगितले.

करीना कपूरने शेअर केला पुणे पोलिसांचा ‘तो’ व्हिडीओ, राज कपूर यांच्या चित्रपटातील गाणे ऐकताच म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यापुढे प्रियांका चोप्राने ‘काळ्या रंगाचे मणी मंगळसूत्रामध्ये का वापरतात? त्याचे महत्त्व काय?’ याबद्दल सांगितले. “मी स्वतः रोज काहीतरी नवीन शिकत आहे आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे. मंगळसूत्रातील काळ्या रंगाचे मोती तुम्हाला वाईट नजरेपासून वाचवतात. त्यामुळेच त्याचा वापर केला जातो.” दरम्यान बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने डिसेंबर २०१८ मध्ये निक जोनाससोबत लग्न केले. जोधपूरच्या उम्मेद भवन पॅलेसमध्ये दोघांचा शाही विवाह पार पडला होता.