‘येऊ कशी तशी मी नांदायला’ ही झी मराठी वाहिनीवरील मालिका जानेवारी महिन्यात सुरु झाली आहे. या मालिकेतील स्वीटू आणि ओमकार प्रेक्षकांच्या भलतेच पसंतीला उतरत असल्याचे पाहायला मिळते. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. सध्या मालिकेतील एका सीनवर सोशल मीडियावर भन्नाट मीम्स तयार करण्यात आले असल्याचे पाहायला मिळाले.
‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेच्या नुकताच प्रदर्शित झालेल्या एका भागामध्ये स्वीटू ही रेल्वेने प्रवास करत असते. प्रवासादरम्यान तिला झोप लागते आणि ती रेल्वे कारशेडमध्ये पोहोचते. स्वीटूला अंबरनाथ स्टेशनला उतरायचे असते पण गाढ झोप लागल्यामुळे ती थेट कारशेडमध्ये पोहोचते. याच सीनवर नेटकऱ्यांनी काही मीम्स तयार केले आहेत.
View this post on Instagram
View this post on Instagram
एका मीममध्ये तर ‘मुंबई पुणे मुंबई’ प्रमाणे ‘मुंबई अंबरनाथ मुंबई’ असे लिहित स्वीटू आणि ओमकारचा फोटो वापरला आहे. सध्या हे मीम्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. हे पाहून तुम्हाला नक्की हसू येईल.
‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेची कथा स्वीटू, ओमकार, निलू, शकू , रॉकी या पात्रांभोवती फिरत आहे. तसेच एका गरीब घरातील मुलगी श्रीमंत घरातील सून होणार असल्याचे मालिकेत दाखवण्यात येणार आहे. अभिनेता शाल्व किंजवडेकर आणि अन्विता फलटणकर हे या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत.