छोट्या पदद्यावरील लोकप्रिय मालिका ते बॉलिवूड सिनेमा आणि रिअॅलिटी शो अभिनेत्री हिना खान कायमच चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील हिना चांगलीच सक्रिय असून ग्लॅमरस फोटो शेअर करत नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत असते. नुकतच हिना खानने साडी परिधान करून एक खास फोटो शूट केलंय. साडीतील हिनाच्या लूकला चाहत्यांची चांगलीत पसंती मिळतेय. मात्र याच फोटोशूटवेळी तयार होतानाचा हिनाचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून आता या व्हिडीओमुळे हिना खान ट्रोल होतेय.
हिना खानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. यात हिना खान मेकअप करताना दिसून येतेय. सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केलाय. यात हिनाने शिमरी साडी परिधान केलीय. तर साडीचा पदर न ओढताच ती मेकअप करतेय. मेकअप झाल्यावर हिनाने खांद्यावर पदर घेत काही पोझ दिल्या आहेत. या व्हायरल व्हिडीओला काही चाहत्यांनी पसंती दिली असली तरी अनेकांनी मात्र हिनावर संपात व्यक्त केलाय. काहींनी तर तिच्यावर धर्मावरून निशाणा साधला आहे.
हे देखील वाचा: “ही पहा राधे माँ”, सोनम कपूरची बहीण रियाचा पार्टी लूक पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
View this post on Instagram
अनेक नेटकऱ्यांनी धर्मावरून हिना खानला ट्रोल केलंय. एक युजर म्हणाला, “मुस्लिम असल्याची थोडी तरी लाज राख बहिणी”, तर आणखी एक नेटकरी म्हणाला, “बाई किमान मुसलमान आहेस हे तरी लक्षात ठेवायचं होतं.” आणखी एक नेटकरी हिनाच्या व्हिडीओवर कमेंट करत म्हणाला, “मुसलमान मुलगी आहेस अल्लाची भिती नाही वाटत का?”

हे देखील वाचा: भटजींच्या सांगण्यावरून टायगर श्रॉफच्या नव्या घरात ‘या’ व्यक्तीने केला पहिला प्रवेश
अनेकांनी हिनाला तिच्या धर्मावरून ट्रोल केलं आहे. तर एक युजर म्हणाला, ” काही न दाखवता यांचं कामच होत नाही, बेशरम हिना खान” हिनाने या व्हिडीओत पदर न घेतल्याने तिला ट्रोल व्हावं लागलं आहे.
हिना खान अनेकदा तिच्या स्टाइलमुळे चर्चेत असते. याआधी देखील हिनाने मालदीव ट्रीपचे बिकिनीतील फोटो शेअर केल्याने तिला ट्रोल व्हावं लागलं होतं.