सध्या मराठीमध्ये उत्तमोत्तम ऐतिहासिक चित्रपट प्रदर्शित होत आहेत. ‘पावनखिंड’, ‘फत्तेशिकस्त’, ‘फर्जंद’ यांसारख्या ऐतिहासिक चित्रपटांना तर प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. या सगळ्या चित्रपटांचं दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केलं. आपल्या चित्रपटांच्या माध्यमातून इतिहास प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकापर्यंत पोहोचला पाहिजे हा त्यांचा मुख्य उद्देश असतो. दिग्पाल यांनी त्यांच्या आगामी ऐतिहासिक चित्रपटाच्या तयारीला सुरुवात केली आहे. पण त्याचपूर्वी इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे त्यांनी शेअर केलेली पोस्ट सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

आणखी वाचा – “मी कोणती मशीन आहे का?” तिसऱ्यांदा गरोदर असल्याच्या चर्चांबाबत स्पष्टच बोलली करीना कपूर खान

दिग्पाल सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली. त्यांच्याबरोबरचा फोटो शेअर करत दिग्पाल यांनी म्हटलं की, “रेशीमबाग या ठिकाणी जाण्याचं ती वास्तू अनुभवण्याचं प्रत्येक स्वयंसेवकाचं स्वप्न असतं आणि या सगळ्यात तुम्हाला संघाच्या कुटुंबप्रमुखांचं म्हणजेच सरसंघचालकांचा सहवास लाभणार असेल तर? बालपणापासून स्वयंसेवक असलेल्या मला आणि माझा बंधू निखिल याला हीच पर्वणी मिळाली. २५ आणि २६ जुलै या दोन दिवसातले काही क्षण नव्हे तर काही तास माझ्या आयुष्याला सुवर्ण अनुभवाचे दान देऊन गेले.”

View this post on Instagram

A post shared by Digpal Lanjekar (@digpalofficial)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे त्यांनी सांगितलं की, “शिवराज अष्टकातील चौथे पुष्प ‘शेर शिवराज’ चित्रपट प्रदर्शित झाला आणि मला संघाचे प्रचारक मा. यशोवर्धन वाळींबे यांचा फोन आला. अरे मा. मोहनजींनी (मोहनजी भागवत) २५ आणि २६ जुलैला रेशीमबाग येथे ‘पावनखिंड’ आणि ‘शेर शिवराज – स्वारी अफझलखान’ हे दोन्ही चित्रपट पाहता येतील का? प्रत्यक्ष सरसंघचालक आपली कलाकृती पाहणार…अधीरता, उत्सुकता आणि काहीसा सुखद तणाव होता. सगळ्या भावनांचा कल्लोळ घेऊन आम्ही नागपूरला पोचलो. यावेळी मी, मृणाल ताई, अजय दादा, निखिल, राजवारसा प्रॉडक्शन्सचे निर्माते प्रद्योतजी पेंढरकर, अनिलराव वरखडे आणि क्रिएटिव्ह हेड प्रसादजी कुऱ्हे होते. २५ जुलैला आम्ही रेशिमबागेत दाखल झालो.”

आणखी वाचा – “दिल्लीवाल्यांची यंत्रणा महाराष्ट्रावर भारी” राजकीय घडामोडींबाबत सुप्रिया सुळे यांची महत्त्वाची विधानं

मोहन भागवत यांनी दिग्पाल यांचे दोन्ही ऐतिहासिक चित्रपट पाहिले आणि त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. दिग्पाल यांच्यासह यावेळी मृणाल कुलकर्णी, अजय पुरकर हे दोन्ही कलाकारही उपस्थित होते.