केवळ हॉलिवूडमध्येच नाही तर भारतातही ज्यांचे अनेक चाहते आहेत असे हॉलिवूडचे दिग्दर्शक मार्टिन स्कोर्सेसी यांचा आज वाढदिवस. मार्टिन यांच्या चित्रपटांनी हॉलिवूडच्या चित्रपटविश्वात क्रांति आणली. बोल्ड विषय आणि त्यांची वेगळी मांडणी यासाठी मार्टिन यांचे चित्रपट ओळखले जातात. अमेरिका आणि इतर देशाप्रमाणे भारतातही त्यांचे असंख्य चाहते आहेत. पण मार्टिन यांना मात्र बॉलिवूडच्या एका सुपरस्टारबरोबर काम करायची इच्छा होती जी पूर्ण होऊ शकली नाही.

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान आणि हॉलिवूडचा नावाजलेला अभिनेता लिओनार्डो डिकॅप्रिओ यांना घेऊन एक चित्रपट काढायचा होता. या दोन अवलियांना घेऊन चित्रपट काढायचं मार्टिनचं हे स्वप्न मात्र अधुरंच राहिलं. प्रसिद्ध पटकथा लेखक पॉल श्रेडर यांनीदेखील या गोष्टीची पुष्टी केली होती.

आणखी वाचा : विश्लेषण: अक्षय कुमार कोळसा खाणीतून ६४ जणांना वाचवणाऱ्या ‘रीअल लाईफ हिरो’वर काढतोय चित्रपट, काय आहे खरी घटना?

मार्टिन यांना त्यांच्या ‘Xtreme City’ या चित्रपटात शाहरुख आणि लिओनार्डो या दोघांना घ्यायचं होतं, चित्रपटासाठी मार्टिन यांनी तयारीदेखील केली होती, पण केवळ शाहरुखने नकार दिल्याने या चित्रपटाचं पुढे काहीच झालं नाही. २०१३ मध्ये ‘ओपन द मॅगजीन’च्या एका मुलाखतीमध्ये पटकथा लेखक पॉल श्रेडर यांनी याचा खुलासा केला. शाहरुख आंतरराष्ट्रीय चित्रपटात काम करण्यास तेवढा उत्सुक नसल्याने त्यानेच या चित्रपटासाठी नकार दिला होता असं देखील पॉल यांनी स्पष्ट केलं. शिवाय ज्या प्रोजेक्टमध्ये सगळा कंट्रोल शाहरुखच्या हातात नसतो त्या प्रोजेक्टमध्ये काम करणं शाहरुखला पसंत नसतं हेदेखील त्यांनी नमूद केले.

मार्टिन हे दिग्गज फिल्ममेकर सतयजित रे यांच्या कामाचेही चाहते आहेत. इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी सतयजित रे यांच्या चित्रपटांचं कौतुक केलं आहे. रे यांचे चित्रपट पुन्हा पुन्हा पहिल्याने त्यातून दरवेळी वेगळं काहीतरी शिकायला मिळतं असंही मार्टिन या मुलाखतीमध्ये म्हणाले होते. याबरोबरच भारतीय दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि नीरज घायवान यांच्या चित्रपटांचंही मार्टिन यांनी कौतुक केलं आहे. ‘देव डी’, ‘गँग्स ऑफ वासेपूर’ आणि ‘मसान’सारखे चित्रपट पाहून त्यांनी या दोघांना खास प्रतिक्रीयादेखील दिली होती.

View this post on Instagram

A post shared by Martin Scorsese (@martinscorsese_)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डेव्हिड ग्रॅनच्या ‘किलर्स ऑफ द फ्लॉवर मून’ हा आगामी चित्रपट स्कोर्सेसी प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत. यात लिओनार्डो डिकॅप्रियो, जेसी प्लेमन्स आणि लिली ग्लॅडस्टोन यांच्या प्रमुख भूमिका आहेत आणि मे महिन्यात २०२३ मध्ये कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये याचा प्रीमियर होणार आहे,