Netflix Horror Movies : आजकाल प्रेक्षकांमध्ये हॉरर चित्रपट पाहण्याची क्रेझ खूप वाढली आहे. अलीकडे निर्मातेही या शैलीचे चित्रपट बनविताना दिसत आहेत. जेव्हा एखादा हॉरर चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होतो तेव्हा तो प्रदर्शित होताच हिट होतो. तो इतर चित्रपटांपेक्षा बॉक्स ऑफिसवर जास्त कमाई करतो.

आता बरेच लोक हॉरर चित्रपटांचे शौकीन झाले आहेत. जेव्हा त्यांना संधी मिळते तेव्हा त्यांना असेच चित्रपट ऑनलाइन पाहायला आवडतात. नेटफ्लिक्स आता तुमच्यासाठी बरेच हॉरर चित्रपट घेऊन आले आहे, जे तुम्ही कधीही पाहू शकता.

माँ

यावेळी काजोल एक हॉरर चित्रपट घेऊन आली. तिचा ‘माँ’ हा चित्रपट अनेकांना आवडला. या चित्रपटात एका आईची कहाणी आहे, जी आपल्या मुलीला वाचवण्यासाठी वाईट शक्तींविरुद्ध लढते.

शैतान

अजय देवगण आणि आर. माधवन यांचा शैतान हा चित्रपट हिट ठरला. माधवनने या चित्रपटाद्वारे लोकांना खूप घाबरवले आहे. हा गुजराती चित्रपट ‘वाश’चा हिंदी रिमेक आहे. तो पाहिल्यानंतर सर्व जण घाबरले होते. हा चित्रपट अनेकांना आवडला.

बुलबुल

‘अ‍ॅनिमल’पासून तृप्ती डिमरी प्रसिद्ध झाली आहे: पण त्याआधी तिचा ‘बुलबुल’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता, ज्याने सर्वांना प्रभावित केले होते. ‘बुलबुल’ नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता आणि हा चित्रपट लोकांना आवडलादेखील होता.

अपोस्टल

नेटफ्लिक्सवरील सर्वांत भयानक चित्रपटांपैकी एक म्हणजे अपोस्टल. २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या या हॉरर चित्रपटात खूप भयानक दृश्ये आहेत. तो एकट्याने पाहण्यासाठी तुमचे हृदय मजबूत असणे आवश्यक आहे.

फियर स्ट्रीट भाग १ : १९९४

फियर स्ट्रीट भाग १ : १९९४ हा नेटफ्लिक्सवरील सर्वांत हॉरर चित्रपटांपैकी एक आहे, जो तुम्हाला हादरवून टाकेल. हा अमेरिकन चित्रपट २०२१ मध्ये प्रदर्शित झाला होता.