अभिनेता सिद्धार्थ चांदेकर प्रिया बापटला म्हणाला ‘दीदी ये तुने क्या किया ?’

हॉटस्टारवर प्रदर्शित होणारी ‘सिटी ऑफ ड्रीम्स’या वेब सीरिजला रिलीज होण्यासाठी काही तास उरले आहेत.

sidharth
Photo-Loksatta File Photo

मराठी कलाक्षेत्रातील लोकप्रिय अभिनेता म्हणजे सिद्धार्थ चांदेकर. त्याने आजवर बऱ्याच लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं आहे. मात्र अभिनेत्री प्रिया बापट, अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अतुल कुलकर्णी यांची मुख्य भूमिका असलेली वेब सिरिज ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ चांगलीच गाजली होती. या सीरिजचा दुसरा सीजन प्रेक्षकांच्या भेटीला येत असून प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. यातील कलाकार देखील तेवढेच उत्सुक असल्याचे दिसून येत आहे. हे कलाकारही सीरिज संबंधीत सोशल मीडियावर पोस्ट करताना दिसत आहेत. अभिनेता सिद्धार्थ सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो . त्याने केलेल्या पोस्ट नेहमीच मजेदार आणि लक्ष वेधून घेणाऱ्या असतात. त्यावर त्याचे फॅन्स देखील आवर्जून कमेंट्स करून आपले मत व्यक्त करताना दिसतात. सिद्धार्थने अशीच एक पोस्ट  शेअर केली आहे. त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर सध्या व्हायरल होताना दिसत आहे.

हॉटस्टारवर प्रदर्शित होणारी ‘सिटी ऑफ ड्रीम्स’या वेब सीरिजला रिलीज होण्यासाठी काही तास उरले आहेत. अशात सिद्धार्थने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तो प्रिय बापटला प्रश्न विचारताना दिसत आहे. सिद्धार्थने शेअर केलेल्या या पोस्ट खाली, “ये क्या किया तुने दीदी……! फक्त एक दिवस” असे कॅप्शन दिले आहे. या पोस्टमध्ये सिद्धार्थ आणि प्रिया एका सोफ्यावर बसलेले दिसून येत आहेत. हा फोटो सीरिजमधील एका सीनमधला आहे. यात प्रिया बापटने पिवळ्या रंगाची साडी आणि हिरव्या रंगाचा ब्लाउज परिधान केला असून सिद्धार्थने पांढऱ्या रंगाचा कुर्ता परिधान केल्याचे दिसून येत आहे.

सिद्धार्थच्या या पोस्टवर प्रियाने ‘आशू….’ अशी कमेंट केली असून फॅन्स देखील यावर कमेंट्स वर्षाव केल्याचे दिसून येत आहे. एक युजरने लिहिले की, “दीदी आता तु गेली कामातुन.” दुसऱ्या युजरने लिहीले की, “दुसऱ्या सीजनची आतुरतेने वाट बघत आहे.”

priya bapat
Photos-Siddharth Chandekar Instagram.

‘सिटी ऑफ ड्रीम्स’या वेब सीरीजमध्ये अभिनेत्री प्रिया बापट आणि सिद्धार्थ चांदेकरमध्ये बहिण-भवाचे नाते दाखवण्यात आले आहेत. त्यांच्या सोबतचं अतुल कुलकर्णी, देवस दीक्षित, विकास केणी, संदीप कुलकर्णी असे अनेक दिग्गज मराठी कलाकार झळकणार आहेत. मराठी कलाकारांच्या दमदार अभिनयामुळे ‘सिटी ऑफ ड्रीम्स’चा पहिला सीझन प्रचंड गाजला होता. ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या वेब सीरिजचे दिग्दर्शन नागेश कुन्नूर यांनी केले आहे. ही वेब सीरिज हिंदी, मराठीसह इतर भाषेत देखील प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ सीरिज ३० जुलैला हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होतं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Hot star web series city of dreams season 2 actor siddharth chandekar priya bapat photo went viral aad

ताज्या बातम्या