OTT Release This Week : या आठवड्यात नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडीओ इत्यादी ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक उत्तम चित्रपट आणि मालिका प्रदर्शित होणार आहेत. या संपूर्ण आठवड्यात तुम्हाला ओटीटीवर अ‍ॅक्शनपासून ते कॉमेडीपर्यंत सर्व गोष्टी पाहायला मिळणार आहेत.

या वर्षीच्या टॉप कॉमेडी चित्रपट ‘हाऊसफुल ५’ पासून ते ‘बकैती’पर्यंत अनेक चित्रपट आणि मालिका ओटीटीवर येणार आहेत. चला तर मग जाणून घेऊया, या आठवड्यात (२८ जुलै ते ४ ऑगस्ट) कोणते चित्रपट आणि सीरिज ओटीटीवर प्रदर्शित होणार आहेत?

हाऊसफुल ५

अक्षय कुमार, रितेश देशमुख व अभिषेक बच्चन यांचा कॉमेडी चित्रपट ‘हाऊसफुल ५’ १ ऑगस्टला प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षक हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. या मल्टीस्टारर चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूप कमाई केली. त्याला प्रेक्षकांकडूनही खूप चांगला प्रतिसाद मिळाला.

बकैती

ही कथा जुन्या गाझियाबादमध्ये घडणारी आहे आणि कटारिया कुटुंबाची कहाणी सांगते. आर्थिक अडचणींमुळे त्रस्त असलेले हे कुटुंब त्यांच्या घरात एक खोली भाड्याने देते. या सीरिजमध्ये राजेश तैलंग, शीबा चड्ढा, तान्या शर्मा, आदित्य शुक्ला व केशव साधना यांच्या भूमिका आहेत. ही सीरिज २ ऑगस्टला झी ५ वर प्रदर्शित होणार आहे.

ब्लॅक बॅग

जर तुम्हाला थ्रिल आणि सस्पेन्सने भरलेला चित्रपट पाहायचा असेल, तर तुम्ही ब्लॅक बॅग पाहावा. त्यामध्ये ब्रिटिश गुप्तचर अधिकारी जॉर्ज वुडहाऊस यांच्या पत्नीवर देशद्रोहाचा संशय असतो. ही अदभुत कथा पाहिल्यानंतर तुम्हाला खूप मजा येईल. हा चित्रपट २९ जुलैला जिओ हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.

थम्मुडू

वेणू श्रीराम दिग्दर्शित ‘थम्मुडू’ हा दक्षिण भारतीय चित्रपटांपैकी एक आहे. प्रेक्षक या तेलुगू चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. भाऊ आणि बहिणीच्या भावनिक कथेवर आधारित हा चित्रपट रक्षाबंधनाच्या फक्त आठ दिवस आधी १ ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

चीफ ऑफ वॉर

‘चीफ ऑफ वॉर’ ही एक अमेरिकन मालिका आहे. त्यात जेसन मोमोआ, लुसियन बुकानन, टेमुएरा मॉरिसन, क्लिफ कर्टिस यांच्या भूमिका आहेत. ही मालिका १८ व्या शतकातील एका कथेवर आधारित आहे. १ ऑगस्टपासून तिचे Apple TV+ वर स्ट्रीमिंग सुरू होईल.

क्योंकि साँस भी कभी बहू थी २

‘क्योंकि साँस भी कभी बहू थी’ची रिबूट आवृत्ती टीव्हीवर पुनरागमन करत आहे. स्मृती इराणी पुन्हा एकदा तुलसी विराणीच्या रूपात सर्वांची मने जिंकणार आहेत. ही मालिका टेलिव्हिजन प्रीमियरसह OTT वर देखील प्रसारित केली जाईल. ही मालिका आज मंगळवार २९ जुलैपासून जिओ हॉटस्टारवर सुरू होणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.