Tamannaah Bhatia Weight Loss Journey : तमन्ना भाटियाला कोणत्याही ओळखीची गरज नाही. आपल्या अभिनयाने आणि ग्लॅमरस लूकने चाहत्यांची मने जिंकणारी तमन्ना भाटिया आज ‘फिटनेस आयकॉन’ म्हणूनही ओळखली जाते. ती जितकी सुंदर आहे, तितकीच ती तिच्या फिटनेसचीही काळजी घेते. काही काळापूर्वी तिच्या वजन वाढीबद्दल चांगलीच चर्चा झाली होती

खरंतर, अभिनेत्री तमन्नाने फक्त ९० दिवसांत ५ ते १० किलो वजन कमी केले आहे. तमन्नाने तिचे वजन कसे कमी केले? तमन्नाच्या जिम ट्रेनरने स्वतः या तीन निरोगी सवयी शेअर केल्या, ज्या तिला फक्त तीन महिन्यांत वजन कमी करण्यास मदत करण्यासाठी खूप उपयुक्त ठरल्या.

तमन्नाने ९० दिवसांत १० किलो वजन केले कमी

तमन्ना भाटियाचे ट्रेनर सिद्धार्थ सिंगने अलीकडेच इंडिया टाइम्सबरोबर वजन कमी करण्यासाठी तीन सोप्या पण प्रभावी टिप्स शेअर केल्या, ज्यामुळे तमन्नाने कोणत्याही शॉर्टकटचा अवलंब न करता अंदाजे ५ ते १० किलो वजन कमी केले.

सिद्धार्थ म्हणाला की, वजन कमी करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे निरोगी सवयींचा अवलंब करणे. योग्य गोष्टी फॉलो केल्या की तुम्ही तीन महिन्यांत किमान ५ ते १० किलो वजन कमी करू शकता. सोप्या टिप्स फॉलो करून तुम्ही तुमचे वजन कमी करण्याचे ध्येय सहज साध्य करू शकता. सिद्धार्थ सिंग म्हणाला की “Don’t be a Potato!” म्हणजेच सतत हालचाल करा, पौष्टिक खा आणि पाण्याचं प्रमाण राखा. या तीन सवयी जीवनशैलीचा भाग बनवल्यास केवळ वजन कमी होणार नाही, तर शरीरही टोन होईल.

कामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर तमन्ना भाटिया नुकतीच ‘डू यू वाना पार्टनर’ या डायना पेंटीबरोबरच्या सीरिजमध्ये झळकली असून, तुम्ही ही सीरिज Amazon Prime Video वर बघू शकता. पुढे ती सिद्धार्थ मल्होत्राबरोबरच्या पौराणिक प्रोजेक्ट ‘Vvan’ मध्ये दिसणार आहे.

हिंदी व तेलुगू चित्रपटसृष्टीत एकापेक्षा एक भूमिका साकारत अभिनेत्री तमन्ना भाटियाने अभिनय क्षेत्रात स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. ‘स्त्री २’, ‘बाहुबली २: द कनक्लुजन’, ‘हमशकल’, ‘श्री’, ‘रेडी’ अशा अनेक चित्रपटांसाठी अभिनेत्री ओळखली जाते. तिच्या अभिनयाबरोबरच तिच्या डान्सचेदेखील मोठे कौतुक होताना दिसते.