‘जोधा अकबर’ चित्रपट असो किंवा ‘मोहेंजोदारो’, ऐतिहासिक भूमिकांच्या साच्यात हृतिक परफेक्ट बसतो असे म्हणायला हरकत नाही. Immortals of Meluha ‘मेलुहाचे मृत्यूंजय’ या पुस्तकावर आधारित चित्रपटात हृतिक मुख्य भूमिका साकारणार असल्याची माहिती समोर येतेय. संजय लीला भन्साळी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असल्याचं म्हटलं जात आहे.

या पुस्तकाचे तीन भाग असून Secret of the Nagas ‘नागांचे रहस्य’ आणि The Oath of the Vayuputras ‘शपथ वायुपुत्रांची’ हे पुढील दोन भाग आहेत. यामध्ये शंकराची उत्पत्ती कशी झाली, मेलुहावर कशा प्रकारे राज्य केले आणि पार्वतीशी लग्न यासंदर्भात वर्णन करण्यात आले आहेत. दिग्दर्शक करण जोहर या चित्रपटाची निर्मिती करणार असल्याची याआधी चर्चा होती. चित्रपटासाठी करणने लेखकाकडून अधिकारही मिळवल्याची माहिती होती. मात्र हिंदू देवतेवर चित्रपट निर्मितीनंतर काय परिणाम होतील या भीतीने करणने हा प्रोजेक्ट सोडल्याचे म्हटले जातेय.

वाचा : अक्षय कुमारचा ‘हा’ सहकलाकार करतोय मृत्यूशी सामना, फेसबुकवर मागितली मदत

‘करार संपला असून मी आणि करण आता त्यावर काम नाही करत आहोत,’ असे लेखक अमिश त्रिपाठीने स्पष्ट केले. ‘शुद्धी’ असे चित्रपटाचे नावही करणने निश्चित केले होते. त्याशिवाय वरुण धवन, सलमान खान आणि टायगर श्रॉफ यांसारखे अभिनेते यात काम करणार असल्याचीही चर्चा होती. पण, त्यापुढे मात्र काहीच होऊ शकलं नाही.

VIDEO : ‘हसीना पारकर’चा ट्रेलर लाँच

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या चित्रपटाचे अधिकार संजय लीला भन्साळी यांना मिळाले असून शंकराची भूमिका हृतिक रोशन साकारणार असल्याची माहिती आहे. संजय लीला भन्साळी आणि हृतिक रोशनने याआधी २०१० मध्ये ‘गुजारिश’ या चित्रपटासाठी एकत्र काम केले होते.